1 min read

चहार्डी गावाला अनाथ गाव घोषित करण्यात यावे या संदर्भात जिल्हा परिषदचे सी.ई .ओ.साहेब याना जळगाव जिल्हा आम आदमी पार्टी तर्फे निवेदन

Loading

चहार्डी गावाला अनाथ गाव घोषित करण्यात यावे या संदर्भात जिल्हा परिषदचे सी.ई .ओ.साहेब याना जळगाव जिल्हा आम आदमी पार्टी तर्फे निवेदन

जळगाव जिल्हाआम आदमी पार्टी तर्फे चहार्डी गावा संदर्भात निवेदन देण्यात आले
चोपडा तालुक्यातील 2नंबर
लोकसंख्या असलेलं हे गाव आहे या गावांमध्ये ग्रामसेवक सतत गैरहजर असल्यामुळे तिथल्या नागरिकांना सुविधा मिळत नाही जसे की उतारे, दाखले,गावातील समस्या साफसफाई ,उघड्यावरील मैला नदीत वाहून जातो त्यामुळे नळाचा पाण्याचा रिपोर्ट दूषित आलेला असून तरीदेखील ग्रामसेवक. सरपंच.कोणीही कारवाई करीत नाही यामुळे गावकरी पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत ग्रामपंचायत मधील कामगारांचा पगार स्थगित असल्यामुळे कामगार कामावर येत नाही व दिव्यांग बंधू भगिनी यांना निधी मिळाला नसून दिव्यांग वंचित आहेत.व विविध प्रकाराच्या गावातील समस्या.याकरिता गावासाठी पूर्ण वेळ ग्रामसेवक यांची नियुक्ती करावी यासंदर्भामध्ये आम आदमी पार्टीचे साखळी उपोषण गेल्या 09 ऑगस्ट पासून आजच्या दिवसापर्यंत सुरू आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुद्धा नागरी सुविधां करिता ग्रामस्थांना आंदोलन सुरू ठेवावे लागले तसेच चोपड्याचे सी.ई.ओ.व बी. डी.ओ.साहेबांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही यामुळे गावकऱ्यांना तीव्र आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे या करता जिल्हाध्यक्ष मिलिंद चौधरी यांनी जिल्हा परिषद सीईओ साहेब यांची भेट घेऊन चहार्डी गावकऱ्यांची व्यथा मांडली आपण दोन दिवसात प्रत्यक्ष चहार्डी गावाला भेट दयावी व तेथील ग्रामस्थांची व्यथा ऐकून त्वरित पूर्णवेळ ग्रामसेवक नियुक्त करावे अन्यथा चहाडी गावाला अनाथ गाव म्हणून घोषित करावे असे यावेळी जिल्हाध्यक्षांनी मागणी केली यावेळेस उपस्थित
माजी जळगाव शहर महानगर कार्य अध्यक्ष योगेश हिवरकर.मीडिया प्रमुख योगेश भोई.डॉ अनुजा पाटील.सरिता तायडे.डॉ नारायण आटकोरे.पवन खंबायत.ओम प्रकाश अग्रवाल.मुकुंदा बराटे.भीमराव मोरे.आदी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *