1 min read

अखेर अमळनेर तालुक्याची मुलुख मैदान तोफ काळाच्या पडद्याआड

Loading

अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव पाटलांचे वृद्धपकाळाने निधन

आज 23 रोजी दहिवद येथून 2 वाजता निघणार अंतयात्रा

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांची अनेक आंदोलने महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. बापूसाहेब यांनी साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून अमळनेर व दहिवद येथे विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था करून दिली. आमदार असतांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना शिंगाळे मोर्चा काढून आपल्या अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाला ते भाग पाडत. म्हणून ते महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. कै बापूसाहेब गुलाबराव पाटील हे मुलुख मैदान तोफ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे भाषण नेहमीच अहिराणी भाषेत असायचे. त्यांचे वृद्धपकाळाने काळाने निधन झाल्यामुळे संपूर्ण अंमळनेर तालुक्यावर दुःखद कोसळले.
अमळनेर तालुक्याचे माजी आमदार साथी गुलाबराव वामनराव पाटील रा. दहिवद यांचे आज रोजी दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 23 रोजी 2.00 वाजता दहिवद येथील घरून निघणार आहे तसेच सकाळी साने गुरुजी विद्यालय अमळनेर येथील पटांगणात 7 ते 8 वाजेपर्यंत मुखदर्शनासाठी थांबणार आहोत तरी शोकाकुल बंधू आणि बघिनींनी मुखदर्शनास यावे तदनंतर 8 वाजता दहिवद येथे रवाना होणार आहेत साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी सांगितले.
त्यांच्या दुःखात साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ व सर्व संचालक मंडळ,
मुख्याध्यापक साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व अमळनेर तालुक्यातील सर्व बापूंवर प्रेम करणारे कार्यकर्ते ,आप्तेष्ट विविध शिक्षण संस्थाचे पदाधिकारी, नामदार अनिलदादा पाटील, डॉ. बी.एस.पाटील,माजी आमदार स्मिताताई वाघ, शिरीषदादा चौधरी, साहेबरावदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक पाटील,संचालक मंडळ, खाशी मंडळाचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप,शिवसेना, आम आदमी पार्टी, आरपीआय, मनसे पक्षाचे पदाधिकारी,
पंचायत समिती सभापती सदस्य, जिल्हा परिषद चे सदस्य ,ग्रामीण भागातील सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य ,मुख्याध्यापक शिक्षक,सर्व संघटना सहभागी आहेत.

कै माजी आमदार साथी बापूसाहेब गुलाबराव पाटील कट्टर समाजवादी विचार सरणीचे , महाराष्ट्राची मुलूख मैदान तोफ, शिंगाडे मोर्च्याचे जनक , सर्व सामान्यांसाठी सातत्याने झटणारे , सातत्याने अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारे , आमच्या साने गुरुजी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सर्वेसर्वा आदरणीय साथी गुलाबराव पाटील यांचे आज संध्याकाळी निधन झाले . बापूंच्या जाण्याने केवळ खान्देशच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र एका चांगल्या अभ्यासू रोखठोक विचारवंतास मुकला .
कै बापूंना साने गुरुजी परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली .
सेवानिवृत्त मुख्याध्यापक आबासाहेब एस.डी.देशमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *