1 min read

मुंबईतील शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नका:- अनिल बोरनारे

Loading

मुंबईतील शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नका:- अनिल बोरनारे

यंदाची संचमान्यता स्थगित करा

मुंबई:ठाणे. (मनिलाल शिंपी) यंदाची संचमान्यता स्थगित करून १५ जूनपर्यंत आधार अपडेट केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरून नव्याने संचमान्यता द्या अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे
याबाबत अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे

शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या संचमान्यता शाळांना वितरित केल्या असून संचमान्यतेच्या आधारावर शाळांमधील अतिरिक्त व रिक्त जागांची माहिती शिक्षण विभागाकडे कळविण्याचे आदेश शाळांना दिले आहेत
सदर संचमान्यततेत ३० नोव्हेंबर २०२२ रोजी पटावर असलेले विद्यार्थी ग्राह्य धरले आहेत तथापि राज्यात विद्यार्थ्यांचे आधार अपडेशनचे काम सुरू होते यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या आधारची पडताळणी न झाल्याने असे हजारो विद्यार्थी या संचमान्यतेत ग्राह्य धरले नाहीत त्यामुळे शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. मुंबईत अतिरिक्त होण्याचे प्रमाण जास्त आहे
शाळांनी १५ जूनपर्यंत आधार अपडेशन केल्याने या हजारो विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात यावा व सद्यस्थितीत असलेली संचमान्यता स्थगित करून १५ जुनची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरून नव्याने संचमान्यता देण्यात यावी तो पर्यंत मुंबई व राज्यातील इतर कोणत्याही शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्याला अतिरिक्त ठरविण्यात येऊ नये अशी मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *