मंगळ ग्रह सेवा संस्था आयोजित गीत गायन स्पर्धेत सार्थक पाटील प्रथम!
देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचा उद्या बक्षीस वितरण सोहळा!
![]()

मंगळ ग्रह सेवा संस्था आयोजित गीत गायन स्पर्धेत सार्थक पाटील प्रथम!
देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचा उद्या बक्षीस वितरण सोहळा!
अमळनेर प्रतिनिधी
76व्या स्वातंत्र्यदिना निमित्त जगप्रसिद्ध मंगळ ग्रह मंदिर प्रायोजित व्हॉइस ऑफ मीडिया व राज्य पत्रकार संघ आयोजित देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत सार्थक उज्वल पाटील, तेजस्वी योगेश भामरे, जयेश संदीप बागुल यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. जान्हवी हेमंतकुमार बागुल, निष्का अरविंद संदानशीव, स्वरा राहुल पाटिल, वैष्णवि नरेंद्र सोनार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
खुल्या गटात 14 ऑगस्ट रोजी सुभाष चौकात संपन्न झालेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्या दि. 22 रोजी सायंकाळी ५ वाजता मंगळ ग्रह मंदिरात होणार असून डिगंबर महाले, राज्य मराठी पत्रकार संघ व व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
देशभक्तीपर गितगायन स्पर्धेचे सूत्र संचालन धनंजय सोनार यांनी तर परीक्षण प्राजक्ता पाटील व नयना कुलकर्णी यांनी केले.
सर्व चाहते, व नागरिकांनी या गुणगौरव सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन मंगळ ग्रह सेवा संस्था अध्यक्ष डिगंबर महाले यांनी केले आहे.

