अमळनेरला तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी जयंतीनिमित्त अभिवादन
![]()

अमळनेरला तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी जयंतीनिमित्त अभिवादन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुका काँग्रेस आयोजित स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांचा सद्भावना दिवस मुन्ना भाऊ शर्मा यांच्या वाड्यात साजरा करण्यात आला राजीव गांधीजींच्या आठवणी जाग्या करण्यासाठी तालुक्यातील काँग्रेस प्रेमी व राजीव गांधीजींवर प्रेम असणारे अनेक कार्यकर्त्यांनी राजीव जी गांधी यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला याप्रसंगी अनेक कार्यकर्ते त्यांच्या आठवणी सांगताना भाऊक झाले उदाहरणार्थ भारत देशातील तरुणांचा विचार करून मतदानाचे वय 18 वर्ष करून त्यांनी युवकांना देशाच्या जडणघडणीचा अधिकार दिला आपल्या शिक्षणाचा व उदारमतवादाचा ठसा त्यांनी उमटवताना संगणक क्रांती आपल्या देशामध्ये विकसित करून प्रगतीचा वेग शतपटीने वाढविला एवढेच नाही तर जागतिक राजकारणात भारताची भूमिका अधिक सक्षम करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन भारतीय नागरिकांची मान जगभरात उंच केली यासह अनेक प्रसंगाचा उल्लेख मान्यवरांनी केला यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष मुन्ना भाऊ शर्मा काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते संदीप घोरपडे काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष बन्सीलाल भागवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर अनिल शिंदे प्राध्यापक सुभाष पाटील सुरेश दादा पाटील शांताराम पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील सेक्रेटरी राजीव दादा फाफोरेकर डबिर पठाण ,आशिष शर्मा एस सी तेले प्रतापराव पाटील मगन भाऊसाहेब पाटील
सोमचंद संदनशिव यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

