देवगाव देवळीचा भूषणचे काम ठरले भूषणावह
![]()
देवगाव देवळीचा भूषणचे काम ठरले भूषणावह
भूषण माळी यांची SSC GD मार्फत ITBP पॅरा मिलिटरी मध्ये निवड

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जिद्द चिकाटी, सातत्य असेल तर आपण पाहिलेले स्वप्न सत्यात उतरते हे देवगांव देवळी ता.अमळनेर येथील ग्रामीण भागात महात्मा फुले हायस्कूल मध्ये दहावी पर्यत शिक्षण घेत अमळनेर प्रताप महाविद्यालयात पदवी पर्यत शिक्षण घेतले
भूषणने स्पर्धा परीक्षा कडे कल होता.त्याने मेहनत घेत त्याचे स्वप्न साकार करत त्याचे Staff Selection Commission (SSC) द्वारा ITBP मध्ये GD Trade साठी निवड झाली असून…. हे पद भारत सरकारच्या गृहमंत्रालय अंतर्गत येते.त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
गावातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी अभ्यासिका सुरू केली असून भविष्यात अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून गावाचा शाळेचा नावलौकिक करणार आहेत.आज तागायत देवगाव देवळी येथील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांत नोकरीत कार्यरत आहेत.अनेक नोकरीला लागलेले विद्यार्थी नेहमीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात तसेच आर्थिक सहकार्य पण करतात.
भूषण माळी हा देवगांव देवळी ता.अमळनेर येथील रविंद्र नवल माळी यांचे चिरंजीव तर मा.सरपंच व देवगाव देवळी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष दादासाहेब नवल बाबुराव पाटील यांचा नातू आहे. त्याचे अभिनंदन महात्मा फुले हायस्कूलचे अध्यक्ष विलासराव पाटील, व संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक अनील महाजन, शिक्षकवृंद, व शिक्षकेतर कर्मचारी व
संघर्ष अभ्यासिका मित्र परिवार देवगाव देवळी, आपले शिवार करू हिरवेगार ग्रुप, ग्रामपंचायत देवगाव देवळी, तथा संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने भूषण माळी आणि त्यांच्या माता पित्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.




