1 min read

गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थी केंद्री शाळा, शिक्षक यावर अधिक भर देणार.
सचिन परदेशी

Loading

गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थी केंद्री शाळा, शिक्षक यावर अधिक भर देणार.
सचिन परदेशी
विद्यार्थी हा शिक्षणाचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू असून त्याचा शिक्षणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण विकास घडवून आणण्यासाठी विद्यार्थी केंद्री शाळा आणि शिक्षक यावर अधिकाधिक लक्ष केंद्रीत करून गुणवत्ता विकास वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे विचार माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांनी त्यांच्या दालनात विविध संघटनांच्या माध्यमातून सत्कारा प्रसंगी व्यक्त केले.याप्रसंगी डॉ.मिलिंद बागुल, माध्यमिक पतपेढी भुसावळचे संचालक तुळशीराम सोनवणे, गोपाळ महाजन, जळगाव माध्यमिक पतपेढीचे संचालक जे. पी. सपकाळे, बहुजन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे शुद्धधोन सोनवणे, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष गोविंदा पाटील,सुरेश कोल्हे, क्रीडा संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, पर्यवेक्षक एल. जे. पाटील, संतोष कचरे, सचिन जंगले, पी.जे. बराटे , उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *