1 min read

‘मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा’

Loading

‘मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा’

(बालपणीच्या मित्रांचे 27 वर्षानंतर गेट-टुगेदर संपन्न)

‘दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा ‘ या ओळींची आठवण करून देणारे अमळनेर येथील आर्मी स्कूलचे उपक्रमशील शिक्षक शरद पाटील हे बालपणी शिकत असलेल्या नूतन माध्यमिक विद्यालय व आताच्या कै.शांताबाई भास्कर पाटील माध्यमिक विद्यालय वाळकी,शेंदणी, मालखेडा ता.चोपडा शाळेच्या 1989 ते 1996 पर्यंत सोबत शिकलेल्या बालपणीच्या मित्र-मैत्रिणींचे एक अनोखे गेट-टुगेदर शिरपूर तालुक्यातील अनेर डॅम,गोरक्षनाथ मंदिर व नागेश्वर मंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
अवघ्या 27 वर्षानंतर सर्व मित्र-मैत्रिणी सहपरिवार एकत्र आले.व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र जमलेली सर्व मंडळी प्रत्यक्ष भेटली.भेटून प्रत्येकाला आनंद झाला.नागेश्वर मंदिरावर भोजनाचा आस्वाद घेऊन एकमेकांच्या परिवाराचा परिचय देत सर्व मित्र मैत्रींनी बालपणीच्या खोड्या,दंगा-मस्ती केलेल्या आठवणींना उजाळा दिला.त्यात शेखर पाटील,मनोहर पाटील,गजानन पाटील,सुनिल धनगर,धिरज पाटील,दगडू पाटील,कैलास पाटील,श्रीराम धिवर,मुक्तीलाल मिस्तरी,सतीश राजपूत,समाधान रायसिंग,पूनमचंद, नंदलाल पाकळे, संभाजी,महारू वडर या मित्रांनी सुरुची भोजनाची व्यवस्था केली.तर जळगाव हून बाळू पाटील,सरवड हून उद्योजक असलेले प्रभाकर पाटील,सुरत हून विनायक साळुंखे,बोराजंटी हून राजू धनगर, कुरवेल हून रेखा कोळी,चिमठाणे हून ज्योती राजपूत, महाळपूर हून गुंजन पाटील,योगिता रायसिंग आदी मित्र- मैत्रींनी आपल्या मुलाबाळांसह उपस्थित होत्या.
या गेट-टुगेदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मार्गदर्शन उपक्रमशील शिक्षक शरद पाटील यांनी केले.तर सर्वांच्या उपस्थितीबद्दल शेखर पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *