1 min read

औरंगाबाद पश्चिम शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी
डॉ.बी.जी.गायकवाड

Loading

औरंगाबाद पश्चिम शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी
डॉ.बी.जी.गायकवाड औरंगाबाद प्रतिनिधी
मराठवाड्यातील सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक कला साहित्य, राजकीय पत्रकारिता,आदी क्षेत्रात सातत्याने भरीव कार्य करणारे डॉ.बी.जी.गायकवाड यांची औरंगाबाद पश्चिमच्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख नियुक्तीचे पत्र जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी एका पत्रातून कळविले आहे.या नियुक्तीसाठी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशिर्वादाची शिकवणं पुढे नेण्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट, जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या बांधणीला आणखी बळकटी देऊन प्रसार अन् प्रचार करावा,असे पत्रात कळविले आहे. डॉ.बी.जी.गायकवाड यांच्या निवडीबदद्ल , शिवसेना पश्चिमचे दशरथ मुळे , सरपंच सुनील काळे, सचिव कविता गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य माधुरी सोमासे, मुख्याध्यापक लक्ष्मणराव हिवाळे, ग्रामपंचायत सदस्य अशोक लगड, उद्योगपती संकल्प गायकवाड, स्वराज्य देशा संचालक मुरलीधर बेडगे, उद्योगपती शशीकांत ढमढेरे,शिक्षक संघटनेचे नेते रामकृष्ण बिघोत, समाधान हराळ ,यासह आदींनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *