1 min read

20% अनुदानापासून वंचित असलेल्या शाळांना अनुदान मिळावे

Loading

20% अनुदानापासून वंचित असलेल्या शाळांना अनुदान मिळावे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे निवेदन

मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी ) : 6 फेब्रुवारी 2023 रोजी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना वाढीव 20 टप्पा मिळावा म्हणून शासनाने आदेश पारित केला, सदर अनुदान मिळावे म्हणून ज्ञानेश्वर सर यांनी आमदार नसताना सुद्धा जे प्रयत्न केले होते ते सर्व जगजाहीर आहे , त्याबद्दल कोणालाही शंका बाळगण्याची गरज नाही, सदर शासन आदेशामध्ये शिक्षण विभागाने अनुदान वितरित करताना शिक्षकांना शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यतेचे जावक नंबर व पुरावे पाहूनच अनुदान आदेश वितरित करावा अशी अट आहे.
मात्र ठाणे जिल्ह्याचे वैयक्तिक मान्यता जावक नंबर नोंद असलेले रजिस्टर शिक्षणाधिकारी यांना सापडत नाहीत, तसेच त्यातील बरेचसे पुरावे जीर्ण व वाळवी लागलेले अवस्थेत आढळून आलेले आहेत, काही शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता ह्या कॅम्पमध्ये दिलेल्या आहेत, तर काहींच्या नोंदी त्यावेळीच्या कार्यरत लिपिकांच्या टेबलानुसार ठेवण्यात आल्या होत्या , त्या नोंदींचे रजिस्टर पाच वर्षानंतर निर्लेखित केलेले आहेत, सदरचे पुरावे अशा अवस्थेत किंवा सापडत नसल्याने 20% अनुदानावर आलेल्या शाळांना अनुदान आदेश वितरित करताना शिक्षणाधिकाऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे.
सदर आदेशामध्ये असे म्हटलेले आहे ” जर जावक नंबरच्या नोंदी सापडल्या नाही, तर त्यावेळी कार्यरत शिक्षणाधिकारी, अधीक्षक लिपिक” यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, आणि फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर शिक्षक- शिक्षकेतरांचे 11 मुद्दे तपासून , शालार्थ आयडी देताना सदर गुन्हा नोंद केल्याचे पत्र सोबत जोडायचे आहे, ही सर्व प्रोसेस फार किचकट असल्याने , गुन्हा कोणावर नोंदवायचा यामुळे अधिकारी वर्ग संभ्रमित आहे, त्यामुळे पुढील अनुदान आदेश वितरित करण्यामध्ये दिरंगाई निर्माण झाली आहे.
अशीच परिस्थिती राज्यातील अन्य जिल्ह्यामध्ये असल्याने , पावसाळी अधिवेशन काळामध्ये शिक्षण मंत्री मा. श्री दीपकजी केसरकर साहेब यांचे समवेत सर्व शिक्षक आमदारांची बैठक झाली होती, सदर बैठकीमध्ये जावक नंबरचा मुद्दा जोरदर चर्चेत घेतला असून, यासंदर्भात लवकरच एक शुद्धिपत्रक निघणार आहे.
शुद्धिपत्रक निघण्यास उशीर होत ,असल्याने सर्वच राज्यातील विनाअनुदानित शिक्षक , आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांना सातत्याने फोन करून विचारत आहेत, किमान 200 लोकांशी रोज यासंदर्भात आमदार सर फोनवरून उत्तर देत आहेत, शिक्षकांची व्यथा समजून घेऊन आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे अधिवेशन काळामध्ये भेट घेतली होती, त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब सुद्धा उपस्थित होते, त्यांनीही मा. मुख्यमंत्र्यांना ठाणे जिल्हा व राज्यातील या संबंधातील परिस्थिती लक्षात आणून दिलेली आहे, तात्काळ शुद्धिपत्रक निघावे, आणि खरोखरच जे जबाबदार असतील त्यांना जबाबदारी देऊन शिक्षकांना अनुदानाचा आदेश द्या, असे तोंडी आदेश माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी अधिकाऱ्यांना दिलेले असून सर्व शाळांनी 11 मुद्दे, पैकी सहा मुद्दे जुळतील, सहा मुद्द्यांवर आवश्यकतेनुसार नियुक्ती दिनांक पासून तीन ते सहा वर्षापर्यंत त्यावेळी तपासणी अधिकाऱ्यांचे स्टॅम्प आणि स्वाक्षरी असलेले पुरावे जमा करून ठेवणे.
यावर लवकरच शुद्धिपत्रक यावे म्हणून आमदार ज्ञानेश्वर सर सतत पाठपुरावा करत आहेत,तोपर्यंत सर्व शिक्षक शिक्षकेतर बांधवांनी संयम बालगावा.
पात्र शिक्षकांना 1 जानेवारी 2023 पासूनच अनुदान मिळेल, राज्यातील कोणताही शिक्षक अनुदानापासून वंचित राहणार नाही, त्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर पूर्णपणे प्रयत्न करत आहेत, ते घेत असलेल्या मेहनतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे.अशी माहिती
विष्णू विशे संपर्कप्रमुख यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *