पत्रकार संदीप महाजन कुटूंबासह आत्महत्या करणार…
![]()
पत्रकार संदीप महाजन कुटूंबासह आत्महत्या करणार…
मारहाण करणाऱ्यावर अजून कारवाई नाही..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आमदार किशोर पाटील,त्यांचा मुलगा सुमीत,त्याचे नातेवाईक व ठेकेदार पदधिकारी, त्यांचे समर्थक यांच्या कडून केली जाणारी बदनामीसह दहशत आणि सदर प्रकरणी दुर्लक्षीत करणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हयातील मंत्री & त्यांच्या इशारावर चालणारे व माझ्या तक्रारीसह मागणीला दुर्लक्षीत करणारे पोलीस प्रशासन यांना त्रासुन अन्याय-अत्याचार ग्रस्थ पत्रकार संदीप महाजन ( पाचोरा ) आपल्या कुटूंबासह 15 ऑगष्ट रोजी आत्महत्या करणार आहे..
अजून ही संदीप महाजन यांच्या परीवाराला शासनाने संरक्षण दिले नाही.
संदीप महाजन यांच्या वर हल्ला करणाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मूग गिळुन गप्प बसले आहेत.अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई मारेकऱ्यांना वर झाली नाही. याबाबत राज्यातील सर्व पत्रकार संघटना १७ आँगष्ट पासून आंदोलन करणार आहोत.

