9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आश्रमशाळा पिंपळे बु. येथील रानपाखरांनी पत्रलेखनातुन सातपुडाच्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या पालकांशी साधला संवाद
![]()



9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आश्रमशाळा पिंपळे बु. येथील रानपाखरांनी पत्रलेखनातुन सातपुडाच्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या पालकांशी साधला संवाद
श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित, सु.अ.पाटील प्राथमिक / यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु. ता- अमळनेर जि.जळगाव या ठिकाणी दि.- 10/08/2023 वार- गुरुवार वार रोजी इ.8 वी ते 12 वी तील विद्यार्थ्यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी झालेल्या का कार्यक्रमाची माहिती आपल्या पालकांना दिली पत्रलेखनाने. आपल्या संस्थेच्या अध्यक्षा माईसो सौ.विद्याताई युवराज पाटील व सचिव आदरणीय नानासो श्री.युवराज पाटील यांच्या प्रेरणेतून विविध शालेय उपक्रम राबविले जातात त्यांच्या अनमोल मार्गदर्शनातून मराठी विषय समितीमार्फत विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य विकसित होण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.सदर उपक्रमाचे उद्घाटन माध्यमिक मुख्याध्यापक श्री.उदय पाटील व प्राथमिक मुख्याध्यापक श्री.अविनाश अहिरे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना पत्र लेखनाचे महत्त्व पटवून देण्यात आले सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पत्रलेखनाची आवड निर्माण झाली तसेच त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळाली सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी फलक लेखन श्री. संजु पवार सरांनी केले तर माध्य.शिक्षक श्री. प्रविण पाटील व उच्च माध्यमिक शिक्षक श्री.हेमंत पाटील व यांचे सहकार्य लाभले सदर उपक्रमात मराठी विषय समिती सह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

