बालपण स्कूल पानोडी मध्ये वृक्षारोपण करून माझी माती, माझा देश’ अभियान : क्रांती दिनी वीरांच्या बलिदानाप्रति कृतज्ञता
![]()


बालपण स्कूल पानोडी मध्ये वृक्षारोपण करून माझी माती, माझा देश’ अभियान : क्रांती दिनी वीरांच्या बलिदानाप्रति कृतज्ञता
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्याची सांगता होत असताना आता संपूर्ण देशभरात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियानाला सुरूवात होत आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार बालपण स्कूल पानोडी येथे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
आज बालपण स्कूल पानोडी च्या विद्यार्थ्यांनी क्रांती दिनाचे औचित्य साधून देशाच्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ त्यांना मानवंदना देत देशाच्या हुतात्मा वीर आणि वीरांगनांना अभिवादनासाठी शहीद जवानांचे प्रति ऋण व्यक्त करण्यासोबतच देशाला प्रगतिशील बनवण्याच्या कार्यात योगदान देण्यासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ (माझी माती, माझा देश) या उपक्रमात शाळेच्या आवारात परेडच्या माध्यमातून भारत माता की जय, जय जवान जय किसान, माझी माती…. माझा देश अशा घोषणा देत वृक्षारोपण करून या अभियानात आपला सहभाग नोंदवला. या उपक्रमासाठी बालपण स्कूल चे सर्व शिक्षक वर्ग व बालपण च्या प्रमुख सौ सोनाली मुंढे यांनी विशेष परिश्रम घेतले.

