शैक्षणिक समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा पालघर जिल्ह्यात झंझावती दौरा संपन्न
![]()

शैक्षणिक समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा पालघर जिल्ह्यात झंझावती दौरा संपन्न
****”
पालघर ( मनिलाल शिंपी ):पालघर जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतरांच्या शैक्षणिक समस्या जाणून घ्याव्या म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा दिनांक 7 व 8 ऑगस्ट रोजी केला
जिल्हा नियोजनाची मीटिंग पालघर मध्ये पालकमंत्री माननीय नामदार श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कलेक्टर कार्यालय पालघर यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित होती, सदर मीटिंगमध्ये जिल्हा परिषद शाळेतील तसेच आश्रम शाळेतील शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे विविध शैक्षणिक अडचणी विषय प्रश्न उपस्थित केले
सदरची मीटिंग आटपून पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी ,बोईसर ,पालघर , वाडा , विक्रमगड ,जव्हार, मोखाडा या भागातील शिक्षकांच्या शैक्षणिक समस्या जाणून घेण्यासाठी स .त्तू . कदम विद्यालय पालघर या ठिकाणी सुमारे 200 शिक्षक शैक्षणिक समस्या घेऊन उपस्थित होते , सर्वांच्या शैक्षणिक समस्या जाणून घेतल्या, त्यावर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी मार्गदर्शन केले, त्यानंतर लगेचच शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक कार्यालय तसेच पे युनिट कार्यालयाला भेट देऊन, सहावा टप्पा क्रमांकानुसार जिल्हाअंतर्गतत बदली झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक गैरसोयी मुळे अवघड क्षेत्रात उपस्थित झालेले नव्हते , अशा 40 शिक्षकांची पगार बंद केली आहेत , त्यांच्या वैयक्तिक समस्या जाणून घेऊन बंद असलेला पगार सुरू करावा आणि समस्यांविषयी शिक्षणाधिकारी श्री शेषराव बडे साहेब यांच्याशी चर्चा केली , तदनंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन अंशतः अनुदानित शिक्षक अनुदान आदेश असून का ? वंचित आहे ,त्याची कारणे विचारली, तात्काळ आदेश द्या असे आदेश दिले, अनुकंप मान्यता, संच मान्यता दुरुस्ती, शालार्थ आयडी, तेच मागच्या वेळेच्या दौऱ्यामध्ये दिलेले सर्व विषय सुटले का ? याविषयी विचारणा केली, तसेच पे युनिट मधील पगार वेळेवर होणे, अंशतः अनुदान शाळेतील शिक्षकांच्या टप्प्यावरील मान्यतांची मागणी न करता पगार करणे, प्रॉव्हिडंट फंडाच्या स्लिपा, सेवानिवृत्तांचे फायनल पेमेंट, पीएफ ना परतावा, अन्य थकित बिलांच्याबाबतीत चर्चा करून त्वरित सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले*
तसेच दिनांक -8 ऑगस्ट 2023 रोजी वसई, नालासोपारा, विरार भागातील चिकनच्या शैक्षणिक समस्या जाणून घेण्यासाठी विवा कॉलेज विरार या ठिकाणी शिक्षकांची सभा घेऊन वैयक्तिक प्रश्न समजून घेतले व त्यावर मार्गदर्शन करून, पंडित प्रश्नांची यादी शिक्षणाधिकारी, उपसंचालक यांच्याकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करून सोडवले जातील असे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी आश्वासित केले

