1 min read

जि.प.शाळा थोरगव्हाण येथे जागतिक आदिवासी दिन क्रांतीकारक बिरसा मुंडा स्मृतीदिनी अभिवादन

Loading

जि.प.शाळा थोरगव्हाण येथे जागतिक आदिवासी दिन क्रांतीकारक बिरसा मुंडा स्मृतीदिनी अभिवादन

प्रतिनिधी – निलेश धर्मराज पाटील सर

यावल – यावल तालुक्यातील जि प शाळा थोरगव्हाण येथे आदिवासी दिन क्रांतीकारक बिरसा मुंडा स्मृतीदिन निमित्त अभिवादन करण्यात आले. प्रतिमापुजन गावातील नागरिक किशोर शिवराम पाटील,नामदेव भिका पाटील ईश्वर ओंकार पाटील यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी शाळा व्यवस्थान समितिचे अध्यक्ष विनोद भालेराव व प्रमुख पाहुणे गावाचे पोलीस पाटील गजानन चौधरी व सर्व पालक वर्ग व शिक्षक यांच्या समक्ष कार्यक्रम साजरा करण्यात आला.
मागील ७ वर्षापासून हा उपक्रम शाळेत सुरु केल्यामुळे विद्यार्थ्याना थोर नेते व क्रांतीकारक यांची माहिती मिळते . त्याचे कार्य व देशासाठी त्यांच योगदान या विषयी विद्यार्थ्याना माहिती होते. कार्यक्रमाला विद्यार्थ्याचा व पालकांचा उत्साह व आंनद इतका असतो की सांगु शकत नाही. त्याच्या चेहऱ्यावरील हास्य व समाधान यातच आम्हाला समाधान आहे असे शिक्षकवर्ग म्हणाले.
याप्रसंगी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद भालेराव, उपाध्यक्ष संदिप सोनवणे सदस्य विनोद पाटील, समाधान सोनवनणे, पोलीस पाटील गजानन चौधरी, किशोर शिवराम पाटील,नामदेव भिका पाटील . ईश्वर ओंकार पाटील व सर्व सदस्य, गावातील सर्व माता व पालक वर्ग , ग्रामपंचायतील सरपंच व सर्व सदस्य ,मुख्याध्यापक महेंद्र देवरे, एकनाथ सावकारे , निलेश धर्मराज पाटील, उपस्थित होते. सर्व शालेय कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार निलेश पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *