1 min read

भावेश शरद कोरे या पाचवीच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड, 11 ऑगस्ट 2023 रोजी दु.११ वाजता एबीपी माझा लाईव्ह कार्यक्रमात होणार सहभागी…

Loading

ब्राम्हणवेल येथील कै . बळीराम दादा माध्यमिक विद्यालयाची पुणे येथील ज्ञान की ग्रंथ चळवळ व ABP Maza टी .व्ही न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने भारताची अमृत महोत्सवी वर्ष ( ७५ वर्षे )निमित्ताने पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली होती . या स्पर्धेत साक्री तालुक्यातून एकमेव आमच्या शाळेचा प्रथम क्रमांकाने कु . भावेश शरद कोरे ( इ . ५ वी ) या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय निवड झालेली असून दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी दु.११ वाजता एबीपी माझा लाईव्ह कार्यक्रमासाठी त्याला सहभाग मिळाला आहे. या कार्यक्रमास माननीय नामदार शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर म . राज्याचे शिक्षण राज्यमंत्री ‘ महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सचिव ,संचालक ‘आणि ज्ञान की ग्रंथ चळवळीचे श्री प्रदीप . जी लोखंडे . हे उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रम हा राज्यभर लाईव्ह दिसणार आहे .आणि या शाळेचे विज्ञान शिक्षक श्री काशिनाथ माळी यांची समन्वयक या पदी निवड करण्यात आलेली आहे . या कार्यक्रमास साठी धुळे जिल्हयातून एकूण ५ शाळा खालील प्रमाणे ..मा वि . विरदेल ‘ ता शिदखेडा ‘मा .वि . माळीच ता धुळे . माध्य विद्या . गिधाडे .ता शिरपूर आणि माध्य विद्या बुरझड ता शिरपूर यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *