1 min read

नवी मुंबई कोपरखैरणे येथे स्काऊट गाईड उजळणी/माहिती वर्ग यशस्वीरीत्या संपन्न

Loading

नवी मुंबई कोपरखैरणे येथे स्काऊट गाईड उजळणी/माहिती वर्ग यशस्वीरीत्या संपन्न

मुंबई, ठाणे( मनिलाल शिंपी ) जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभाग, प्राथमिक व माध्यमिक आणि भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा ठाणे यांच्या विद्यमाने तालुका वार/क्षेत्रानुसार दिनांक 25 जुलै ते 8 आगस्ट या कालावधीत विविध तालुक्याच्या /क्षेत्राच्या स्थळी एक दिवसीय स्काऊट गाईड माहिती वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे . दिनांक 04 ऑगस्ट 2023 रोजी मनपा शाळा क्रमांक 35 कोपरखैरणे नवी मुंबई येथे नवी मुंबई महानगर पालिका शिक्षणाधिकारी श्रीमती अरुणा यादव मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत या माहिती वर्गाची सुरुवात, ” दया कर दान भक्ती का” या स्काऊट गाईड प्राथनेने करण्यात आली. यावेळी नवी मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षणाधिकारी तथा सहा. जिल्हा आयुक्त श्रीमती सन्माननीय अरुणा यादव मॅडम यांचं जिल्हा संघटक स्काऊट श्री . किरण लहाने, यांनी तुळस रोप देऊन स्वागत केले. तर विस्तार अधिकारी गोसावी मॅडम, यांनी जिल्हा संघटक श्री. किरण लहाने, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड श्रीमती पुष्पा जगताप, जिल्हा मुख्यालय आयुक्त श्रीमती जोड्डीन अल्मेडा, वरिष्ठ लिपीक श्री.संदिप घुसिंगे, श्री.शिवाजी पार्टे यांचा सत्कार केला.
शाळेच्या प्राचार्या सिंधू जगताप व सहा. प्रशिक्षक ट्रेनर श्रीमती संध्या निकम मॅडम यांनी विस्तार अधिकारी श्रीमती गोसावी मॅडम यांचे तुळस रोप स्वागत केले. मुलांना चांगले संस्कार, निसर्गाची आवड. समाजात कार्य करण्याची आवड, अहिंसा, प्रेम, निर्माण करायचे असेल तर स्काऊट गाईड हा विषय प्रत्येक शाळेत स्काऊट गाईड हा विषय आवश्यक आहे. तसेच जास्तीत जास्त प्रसार व प्रचार व्हावा या करिता तसेच माननिय शिक्षणाधिकारी प्राथमिक तथा जिल्हा मुख्य आयुक्त डॉ.भाऊसाहेब कारेकर यांनी या वर्षी जिल्हा परिषद शाळेत जास्तीत जास्त स्काऊट गाईड कब बुलबुल ची नोंदणी व्हावी या दृष्टीने 10 लाख रुपये सेस फंड मंजूर करण्यात आलेला आहे. त्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील आपल्या मुलांना स्काऊट गाईड च्या माध्यमातून राज्य पुरस्कार ते राष्ट्रपती पुरस्कार मिळवुन देण्याची हि संधी आहे असे प्रतिपादन यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे नवी मुंबई मनपा शिक्षणाधिकारी तथा सहा. जिल्हा आयुक्त गाईड श्रीमती अरुणा यादव यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच प्रास्ताविक जिल्हा संघटक किरण लहाने यांनी केले, जिल्हा मुख्यालय आयुक्त श्रीमती अल्मेडा मॅडम यांनी स्काऊट गाईड चा इतिहास, उपयुक्तता, याबाबत माहिती दिली तर, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड पुष्पा जगताप यांनी प्रशिक्षणाचे टप्पे, संघनायक शिबीर, राज्य पुरस्कार ते राष्ट्रपती पुरस्कार याबाबत माहिती दिली. नवी मुंबई च्या स्काऊट गाईड च्या इन्चार्ज श्रीमती संध्या निकम यांनी अभ्यासक्रमाचे टप्पे सविस्तर समजून सांगितले तर किरण लहाने यांनी नोंदणी बाबत व विविध विषयावर मार्गदर्शन केले शिक्षकांच्या सर्व प्रश्नाचे निरसन करण्यात आले. ऑनलाइन नोंदणी बाबत संदिप घुसिंगे यांनी माहिती दिली.
या माहिती वर्गामध्ये नवी मुंबईतील खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेत तसेच व महानगरपालिकेतील स्काऊटर गाईडर शिक्षकांनी सहभाग नोंदविला. तसेच ऑनलाईन OYMS नोंदणी बाबत कार्यालयांचे वरीष्ठ लिपीक संदीप घुसिंगे यांनी माहिती दिली. या प्रशिक्षण वर्गाकरीता तसेच शासनाने प्रत्येक शाळेत स्काऊट आणि गाईड हा विषय सुरू करण्याबाबत प्रस्तावित असून जास्तीत जास्त शाळेने स्काऊट गाईड कब बुलबुल ची नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी जिल्हा संघटक स्काऊट किरण लहाने यांनी केले आहे. हे माहिती वर्ग यशस्वीरित्या करण्यासाठी मनपा शाळा क्रमांक 35 कोपरखैरणे येथील शिक्षक , व शिक्षकेत्तर कर्मचारी, व ठाणे भारत स्काऊट गाईडचे कर्मचारी श्री.शिवाजी पार्टे यांनी अथक परिश्रम घेऊन यशस्वीरित्या आपले कर्त्यव्य पार पाडले. शेवटी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे श्रीमती संद्या निकम यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *