चाळीसगाव येथील हरिगिरी बाबा मंदिर परिसरात पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण
सेवा सहयोग ग्रामोदयचा वृक्षदिंडी उपक्रम
![]()


चाळीसगाव येथील हरिगिरी बाबा मंदिर परिसरात पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण
सेवा सहयोग ग्रामोदयचा वृक्षदिंडी उपक्रम
चाळीसगाव /प्रतिनिधी
तालुक्यात सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प भुजल अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तालुक्यातील तीस शाळांना वृक्षदिंडी उपक्रमाअंतर्गत प्रति शाळा पन्नास झाडे लावण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून
दि. ०८/०८/२०२३ रोजी सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प व भुजल अभियानाचे गुणवंत दादा व मा.सुचित्रा ताई पाटील यांच्या प्रयत्नातून परमहंस हरीगीरीबाबा समाधी संस्थान परिसरात १००० बांबू चे वृक्ष लागवडी साठी देण्यात आले.सदर बांबू चे रोपण चाळीसगाव शहराचे पोलीस निरीक्षक संदीपजी पाटील यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सुचित्राताई पाटील,मा.नगरसेवक नितीनदादा पाटील, पर्यावरण व जलमित्र सोमनाथ माळी,ॲड. शिवाजी वाय. बाविस्कर,वीरेंद्रसिंग राजपूत, सरदारसिंग राजपूत, राकेश चव्हाण, विलास चव्हाण, अनिल वराडे,संभा राजपूत, निलेश सोनार, राहुल कोळी, धर्मा बच्छे, मुक्तानंद संत्संग मंडळाचे श्री.किशोर वर्मा,श्री.पवन शिनकर व इतर सदस्य उपस्थित होते. परमहंस हरीगीरीबाबा समाधी संस्थान चाळीसगाव यांच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानले.

