कृषी संस्कृती शुद्धीकरणासह पुनर्जिवित करण्यासाठी महात्मा जोतिबा फुलेकृत सत्यशोधक विधी वाढविल्या पाहिजे
-सत्यधर्मिय विधीकर्ते प्रशिक्षणात डॉक्टर सुरेश झाल्टे यांचे प्रतिपादन
![]()


कृषी संस्कृती शुद्धीकरणासह पुनर्जिवित करण्यासाठी महात्मा जोतिबा फुलेकृत सत्यशोधक विधी वाढविल्या पाहिजे
[ सत्यधर्मिय विधीकर्ते प्रशिक्षणात डॉक्टर सुरेश झाल्टे यांचे प्रतिपादन ]
‘ कृषीसंस्कृती शुद्धीकरणासह पुनर्जिवित करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कृत सत्यशोधक विधी वाढवल्या पाहिजे.’असे मार्मिक प्रतिपादन सत्यशोधक समाज संघ संस्थापक राज्य सचिव डॉक्टर सुरेश झाल्टे यांनी केले.रविवार दि.६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय विद्यालय,चाळीसगाव येथे सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य आयोजित महाराष्ट्रातील तिसरे सार्वजनिक सत्यधर्मीय प्रबोधन शिबिर सत्यशोधक समाज संघाचे सचिव डॉ.सुरेश झाल्टे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.त्याप्रसंगी उद्घाटकीय मार्गदर्शन करतांना डॉक्टर झाल्टे बोलत होते.प्रमुख अतिथी चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संदीप पाटील,देशदूत दैनिकाचे संपादक मनोहर कांडेलकर,भगवान महाजन उपस्थित होते.मार्गदर्शनात डॉक्टर झाल्टे पुढे म्हणाले की,’ बाह्मणांनी कष्ट न करता पिढ्या पोसण्यासाठी मुळ कृषी संस्कृतीत अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा वाढवून भितीग्रस्त करीत बहुजन समाजाला वैदीक संस्कृतीच्या खाईत लोटले ‘ प्रशिक्षणार्थ्यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुलेकृत सत्यशोधक समाजाची विज्ञाननिष्ठ आचार प्रणाली अंगिकारण्याचे कळकळीचे आवाहनही सचिव डॉ.झाल्टे यांनी केले.मान्यवरांच्या हस्ते लोक कल्याणकारी राजा महात्मा बळीराजा,छत्रपती शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.प्रमुख अतिथींचे ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन संयोजकांतर्फे स्वागत करण्यात आले.जोतिबा फुले लिखित सत्यशोधक समाजाच्या प्रार्थनेने शिबिराचा प्रारंभ करून खंडेरायाची तळी भरण्यात आली. तद्नंतर उपस्थित प्रशिक्षणार्थींनी परिचय दिला.
सत्यशोधक समाजाचे विधीकर्ते साळूबा पांडव,भगवान रोकडे,भगवान बोरसे यांनी सार्वजनिक सत्यधर्म विधीकर्ते निर्माण करण्यासाठीचे सांगोपांग प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह दिले.यामध्ये सार्वजनिक सत्यधर्मीय विवाह सोहळा,हळदी समारंभ, सत्य पूजा, गृहप्रवेश,बारसे,दशक्रिया विधींचे सांस्कृतिक उदिष्ट्ये व प्रयोजन सांगितले.शिबिराला राजेंद्र निकम (नाशिक ),भालचंद्र महाजन व राजेंद्र माळी ( वाघळी ),देविदास महाजन ( वाडे ),कु.रिद्धी रोकडे (पातोंडे )यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.प्रशिक्षणार्थींनी मनोगतात आम्ही राष्ट्रपिता जोतिराव फुले स्थापित सत्यशोधक समाज संघाचे काम पुढील काळात निर्भयपणे तत्वनिष्ठापूर्वक करून जोतिबांचे विचार जनसामांन्यापर्यंत पोहोचवू असा सामुहिक निर्धार केला.
जिल्ह्यातील या द्वितीय प्राशिक्षण शिबिराची प्रेरणा व मार्गदशन सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक राज्याध्यक्ष अरविंद खैरनार व राज्य सचिव डॉ.सुरेश झाल्टे यांनी दिली.
समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आर.डी. चौधरी होते.प्रशिक्षणार्थींना सत्यशोधक समाज संघाच्या वतीने सत्यशोधक विधी पुस्तक,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन विधीकर्ते साळुबा पांडव,सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा समन्वयक विजय लुल्हे,जिल्हा समन्वयक प्रमोद पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.मार्गदर्शनात पत्रकार आर.डी.चौधरी म्हणाले की,’ श्रद्धा – अंधश्रद्धेच्या सीमारेषा वैदिक परंपरेच्या अधीन झाल्याने संवेदनशील व नाजूक आहेत म्हणून रिद्धी रोकडे सारख्या तरुणींनी क्रांतिज्योती सावित्रीमाईचा वारसा निर्भय व लढाऊवृत्तीने चालऊन महिलांना निरंतर प्रबोधन करीत विज्ञाननिष्ठ केले पाहिजे.’ प्रशिक्षण शिबिर यशस्वीतेसाठी संयोजक सत्यशोधकीय विधीकर्ते भगवान रोकडे व जिल्हा समन्वयक कैलास जाधव,विधीकर्ते शिवदास महाजन,जिल्हा समन्वयक विजय लुल्हे व पी.डी.पाटील यांनी अमूल्य सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पी.डी.पाटील तर आभार विजय लुल्हे यांनी मानले.

