1 min read

सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला प्राधान्य द्यावे-प्रा.डॉ एस.ओ.माळी,

Loading

सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला प्राधान्य द्यावे

सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा.डॉ एस.ओ.माळी यांचे प्रतिपादन

ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलासराव पाटील यांचा सत्कार

अमळनेर प्रतिनिधी- निवृत्तीनंतर लोकांचे जीवनमान कसं असतं ?आणि सगळ्यात महत्त्वाचं एखादी व्यक्ती निवृत्ती झाल्यावर खरंच त्या व्यक्तीचा आयुष्य निवांत होतं का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उपस्थित होतात.जाणीव अजिबात होत नाही सेवानिवृत्तीनंतर स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकतात. स्वतःच्या आत्मसन्मान सुख आरोग्य आणि स्वतःचे अस्तित्व असे सारे आबाधीत ठेवण्यासाठी निवृत्तीनंतर स्वतःला सक्षम ठेवणे गरजेचे आहे.
म्हणून निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नाही निवृत्ती म्हणजे नवीन आयुष्य, नवा आनंद होय. विलासराव पाटील यांनी सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला व परिवाराला वेळ द्यावा असे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा डॉ माळी यांनी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या माध्यमातून सेवानिवृत्ती सत्कार प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून मनोगत व्यक्त करतांना सांगितले..
व्यासपीठावर अहिराणी साहित्य गोकुळ बागुल, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंह पवार, साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे संचालक बी एस जाधव होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी माल्यार्पण केले..
ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलासराव पाटील यांना विचारपिठावरील मान्यवर व ओबीसी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सन्मानपत्र ,शाल, श्रीफळ बुके देऊन सत्कार केला व इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षेचे केंद्र संचालक विजयसिंह पवार यांनी सांगितले कि सेवानिवृत्तीनंतर शैक्षणिक व सामाजिक काम करत असतांना एक मार्गदर्शक म्हणून आपली भूमिका महत्त्वाची असते. शिक्षक कधीच सेवानिवृत्त होत नाही, सेवानिवृत्तीनंतर उलट त्याच्या कामाचा स्पीड अधिक होतो असे सांगितले..
तर अहिराणी साहित्य गोकुळ बागुल म्हणाले की विलासराव पाटील हे विद्यार्थी दशेपासून धडपडणारे व्यक्तिमत्व होते ..शिक्षकीपेशा सांभाळून सामाजिक संघटन त्यांचे मोठे आहे. विविध संघटनेचे नेतृत्व करत राज्यभरात त्यांनी मजल मारली.आपल्या छोट्याशा गावात एक शाळा महात्मा फुलेंच्या नावाने काढून विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. म्हणून ते जरी नोकरीतून सेवानिवृत्त झाले त्यांचे सामाजिक कार्य अधिक जोमाने सुरू राहील असे त्यांनी सांगितले.
सत्कार प्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलासराव पाटील म्हणाले की आज ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी माझा सन्मानपत्र देऊन जंगी सत्कार केला.. हा सत्कार नेहमीच मला भविष्यातही सामाजिक काम करत असतांना प्रेरणादायी राहील व कुटुंबातील माणसाने केलेला सत्कार नेहमीच प्रेरणादायी राहतो असे सांगत त्यांनी आपल्या नोकरीच्या काळात आलेले अनुभव सांगताना ते भावनिक झाले
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ओबीसी शिक्षक असोसिएशनचे शहराध्यक्ष डी.ए सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमाला ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन, तालुका अध्यक्ष सोपान भवरे, जिल्हा कार्यकारणी सदस्य एन आर चौधरी, संघटक मनोहर पाटील, कोषाध्यक्ष आर आर सोनवणे,सदस्य पक्षीमित्र अश्वीन पाटील, मुनाफ तडवी,एस.के.महाजन,मार्गदर्शक एन.ए.साळुंखे,हिंदी अध्यापक मंडळाचे माजी अध्यक्ष दीपक पवार,समता शिक्षक परीषदेचे कार्याध्यक्ष अजय भामरे , प्रहार प्राथमिक शिक्षक संघटनेचे सुधीर चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमात मनोहर भिडे च्या वादग्रस्त विधानाचा जाहीर निषेध करण्यात आला. व निसर्ग कवी ना.धो.महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *