शिक्षकांना जुनी पेन्शन व अंशतः अनुदानित शिक्षकांना प्रचलित अनुदान त्वरीत द्या
![]()
शिक्षकांना जुनी पेन्शन व अंशतः अनुदानित शिक्षकांना प्रचलित अनुदान त्वरीत द्या
शुभांगीताई पाटील यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना साकडे…


अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
राज्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी तसेच राज्यातील अंशतः अनुदानित 20 टक्के 40 टक्के 60 टक्के अनुदान घेत असणाऱ्या शिक्षकांना शंभर टक्के प्रचलित धोरणानुसार वेतन मिळावे या मागणीसाठी शिवसेना उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी काल मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना अजित दादा पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले
राज्यातील सन 2005 नंतर नोकरीला लागलेल्या सर्वच शिक्षक व कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना एनपीएस लागू असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना म्हातारपणात आर्थिक शाश्वती नसल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे व त्याचे कारणही तसे आहे त्यामुळे मागील अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनेसाठी आंदोलने सुरू असून नुकतेच मागील सहा महिन्यापूर्वी जुनी पेन्शन योजनेसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रचंड मोठे आंदोलन केले होते परंतु सरकारकडून त्याला कोणतेही फलित मिळालेले नाही त्यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळावी तसेच राज्यात मागील वीस वर्षापासून विनाअनुदानित तत्त्वावर शिक्षक काम करत असून त्यांनी हजारो आंदोलन करून त्यांना आतापर्यंत केवळ 20 टक्के 40 टक्के व 60 टक्के असे टप्पा अनुदान मिळाले आहे वास्तवात त्यांना पाच वर्षाच्या कालावधीत 100% अनुदान मिळणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही त्यामुळे या शिक्षकांना शंभर टक्के वेतन मिळावे व त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी देखील शुभांगी ताई पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल
यावेळी जुनी पेन्शन योजनेबाबत ची बाब ही केंद्र सरकारच्या अत्याधितला विषय असून त्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले व त्यासाठी आम्ही केंद्राशी चर्चा करू असे देखील आश्वासन दिले तसेच शिक्षकांच्या प्रचलित धोरणानुसार अनुदानाबाबत मागणीवर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दाखवत प्रचलित धोरणानुसार अनुदान देणे आमच्या विचाराधी असून त्यावर आर्थिक परिस्थिती पाहून लवकरच निर्णय घेतला जाईल मी नुकताच वित्त खात्याचा कारभार हातात घेतला असून सर्व बाबी तपासून या विषयावर निर्णय घेऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले

