1 min read

रायबा संस्थेतर्फे शिक्षक रत्न पुरस्कार आयोजन

Loading

रायबा संस्थेतर्फे शिक्षक रत्न पुरस्कार आयोजन

धुळे येथील रायबा बहुउद्देशीय संस्था अंतर्गत विविध क्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा, कृषी, पर्यावरण, आरोग्य, धार्मिक इत्यादी अनेक उपक्रम घेतले जातात. ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो. शिक्षक राष्ट्राचे प्रमुख आधारस्तंभ असतात. राष्ट्रासाठी चांगले विद्यार्थी आणि चांगले नागरिक घडवण्याची जबाबदारी असते. अशा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचा गौरव करणे क्रमप्राप्त ठरते. 3 सप्टेंबर वार रविवार रोजी धुळे येथे भव्य पद्धतीने प्रमुख अतिथींच्या हस्ते आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करणे गरजेचे आहे. म्हणूनच सदर पुरस्कार साठी आयोजन करण्यात आलेले आहे. आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार साठी नामांकन पाठवण्यात यावे. अधिक माहितीसाठी संस्थेचे सचिव प्रमोद पाटील मोबाईल क्रमांक ९८८११९४८१६ यांच्याशी संपर्क करण्याचे करावे. नामांकन पाठवण्याचे अंतिम तारीख ३० ऑगस्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *