1 min read

महात्मा फुले हायस्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन..

Loading

महात्मा फुले हायस्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन..

साहित्य क्षेत्रातील अण्णाभाऊ साठे यांचे कार्य प्रेरणादायी..
अनिल महाजन

अमळनेर प्रतिनिधी-
भारतात अनेक साहित्यिक झालेत. त्यात महाराष्ट्रात झालेल्या साहित्यिकात वैचारिक,विवेकनिष्ठ वैज्ञानिक,मानवकेंद्रीत लिखाण करणारे म्हणून अण्णाभाऊ साठे यांचे नाव घेतले जाते.कारण त्यांच्या लिखाणात तथागत बुध्द, म.फुले, डाॅ. आंबेडकर ,कार्ल मार्क्स यांचा प्रभाव दिसून येतो. आपल्या साहित्यिक लिखाणात साम्यवादी मुल्य व आंतरराष्ट्रीय वैश्विकता मांडल्याने रशिया या देशाने त्यांना विदेशात बोलवून सन्मान केला. त्यांच्या साहित्याचे भाषांतर करून विद्यापीठात ते अभ्यासाला ठेवले आहेत.. पण भारतातील साहित्यिकांनी अण्णाभाऊंच्या साहित्यिकांची नोंद घेतली नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. अण्णाभाऊ साठे यांची साहित्य क्षेत्रातील कार्य तमाम साहित्यिकांना प्रेरणा देणारे आहे असे महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन बोलत होते

व्यासपीठावर शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख ईश्वर महाजन ,सुरेश महाजन, हरी माळी होते.
इयत्ता नववीतील रागिनी पाटील ,सोनाली महाजन यांनी अण्णाभाऊ साठे यांचे कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी एन.जी देशमुख, संभाजी पाटील यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन हरी माळी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *