1 min read

संभाजी भिडेची मिशी कापणाऱ्यास व तोंड काळे करणाऱ्या ५१ हजार रुपयाचे बक्षीस देणार:- जिल्हा उपाध्यक्ष समता परिषद भिमराव महाजन

Loading

संभाजी भिडेची मिशी कापणाऱ्यास व तोंड काळे करणाऱ्या ५१ हजार रुपयाचे बक्षीस देणार:- जिल्हा उपाध्यक्ष समता परिषद भिमराव महाजन

महाराष्ट्रातील महा- पुरुषांबद्दल नेहमीच बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले, लाखों भक्तांचे श्रद्धा असलेले देवस्थान शिर्डीचे साईबाबा व राजा राममोहन राय यांच्यासह अनेक महापुरुषांच्या विषयी अपशब्द वापरले आहेत. तरीपण त्याला राज्यातील भाजप सरकार व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत आहेत. सरकार जर अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना पाठीशी घालत असेल तर जनतेने त्याला धडा शिकवला पाहिजे, आणि नेहमी, नेहमी महा- पुरुषाविषयीची बेताल वक्तव्य करणाऱ्या भिडेंसारख्या अवलादीला चाप बसला पाहिजे, त्यांच्यासारख्यांकडून समाजात वाद निर्माण होईल अशी वक्तव्य थांबवली गेली पाहिजेत. म्हणून जो कोणी या संभाजी भिडेची मिशी कापेल व त्याचे तोंड काळे करेल त्याला मी ५१ हजार रुपयाचे बक्षीस देईल असे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाउपाध्यक्ष, तथा महाराष्ट्र माळी समाज महासंघ जळगावचे जिल्हा कार्याध्यक्ष भिमराव महाजन यांनी सोशल मीडियाद्वारे आव्हान केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *