वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयात रिक्त सहाय्यक लेखाधिकारी पद तात्काळ भरावे. –जुक्टो संघटनेची मागणी.
शेकडो प्रस्ताव मंजुरीविना पडून.
![]()

वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयात रिक्त सहाय्यक लेखाधिकारी पद तात्काळ भरावे. –जुक्टो संघटनेची मागणी.
शेकडो प्रस्ताव मंजुरीविना पडून.
जळगाव: सेवेत कार्यरत असणाऱ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आपल्या भविष्य निर्वाह निधीमधील जमा रकमेचा वैद्यकीय खर्च, स्व मालकीचे घर घेण्यासाठी व इतर आर्थिक निकड भागविण्यासाठी तसेच माहे मे,जूनमध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपली अखेरची भ.नि.नि.मधील जमा रक्कम प्राप्त होण्यासाठी मा.वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयात ना परतावा कर्ज प्रस्ताव सादर केलेला आहे. मात्र त्या प्रस्तावांना अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. कारण सदर कार्यालयातील संबंधित सहाय्यक लेखाधिकारी यांची बदली झालेली असल्याने संबंधित जागी अद्याप कुणाचीही पदस्थापना न झाल्याने सर्व प्रस्ताव मंजुरीविना पडून आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त व सेवारत उ.मा.वि./क.म.वि.शिक्षकांची मोठी आर्थिक कुचंबणा होत आहे. त्यातून तात्काळ मार्ग निघावा, सदर रिक्त पदावर त्वरीत पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी अशी न्याय मागणी प्रा.नंदन वळींकार, प्रा. सुनील सोनार, प्रा.सुनील गरुड, प्रा.डी.डी.पाटील, प्रा. डॉ.अतुल इंगळे, प्रा.शैलेश राणे,प्रा.सुनील पाटील यांनी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शासन दरबारी केलेली आहे.

