कळमसरे विकास सोसायटीच्या चेअरमन पदी रमेश चिंधा चौधरी तर व्हाईस चेअरमन पदी श्रीमती मंगलबाई बडगुजर यांची निवड
![]()



कळमसरे विकास सोसायटीच्या चेअरमन पदी रमेश चिंधा चौधरी तर व्हाईस चेअरमन पदी श्रीमती मंगलबाई बडगुजर यांची निवड
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-
कळमसरे तालुका अमळनेर येथील मा. ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते, प्रगतिशील शेतकरी आबासो रमेश चिंधा चौधरी यांची कळमसरे विकास सोसायटी चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तेली समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते असे आमचे आबासाहेब पूर्ण तालुक्यात आबासाहेब नावाने परिचित असे आबासाहेब आज विकास सोसायटीच्या चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली तसेच व्हॉइस चेअरमन पदी श्रीमती मंगलाबाई दत्तात्रय बडगुजर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या सत्कार करताना भाऊसो माजी उपसरपंच व महाराष्ट्र माळी महासंघाचे अध्यक्ष भाऊसो मुरलीधर राजाराम महाजन यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच पिंटू निकम, कळमसरे ग्रामपंचायतचे उपसरपंच जितेंद्र राजपूत व ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे सेक्रेटरी,विकास सोसायटीचे सर्व संचालक मंडळ व कळमसरे ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

