जिजाऊ बहुउद्देंशीय संस्था व फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुपतर्फे अॅड.ललिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २६ जुलै ला शेतकरी मार्गदर्शन मेळावा…
![]()
जिजाऊ बहुउद्देंशीय संस्था व फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुपतर्फे अॅड.ललिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २६ जुलै ला शेतकरी मार्गदर्शन मेळावा…
प्रसिद्ध हवामान तज्ञ व अभ्यासक पंजाबराव डख शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन …


अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : शेतकऱ्यांना हवामान अंदाजानुसार शेती करता यावी यासाठी जिजाऊ बहुउद्देंशीय संस्था व फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुपतर्फे अॅड.ललिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता गलवाडे रस्त्यावरील अंबिका मंगल कार्यालयात शेतकरी मार्गदर्शन मेळावा होणार आहे. प्रसिद्ध हवामान तज्ञ व अभ्यासक पंजाबराव डख शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
अमळनेर तालुका सतत अवर्षणप्रवणग्रस्त क्षेत्रात मोडतो. अनियमित हवामानामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.उत्पन्न घेता येत नाही. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतात. शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आला तर त्या पद्धतीने शेतकरी उत्पन्न घेऊ शकतात. म्हणून पंजाबराव डख शेतकर्यांना मार्गदर्शन करतील. तरी या कार्यक्रमाचा तालुक्यातील शेतकरी बांधव तसेच नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिजाऊ बहुउद्देशीय संस्था व फिनिक्स अवरनेस ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.

