भारताला युध्दाची नाही तर शैक्षणिक सुधारणांची गरज – प्रा.नरसिंह मूर्ती
![]()
भारताला युध्दाची नाही तर शैक्षणिक सुधारणांची गरज – प्रा.नरसिंह मूर्ती
श्रीरामपूर –
वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन अर्थात जागतिक संविधान व संसद संघ (डब्ल्यूसीपीए) यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवान व्यक्ती व संस्थाना सन्मानित करण्यात आले. हा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक २३ जुलै रोजी श्रीरामपूर येथील नगर परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डब्ल्यूसीपीएचे ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट प्रा.नरसिंहा मूर्ति हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डब्ल्यूसीपीएचे दुसरे ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट वरिष्ठ उपाध्यक्ष तथा जेष्ठ गांधीवादी नेता प्रा.ई.पी मेनन, श्रीरामपूर महाराष्ट्र राज्य संपादक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश कुलथे, समाजसेविका संगिता जामगे आदीनीं उपस्थितांना संबोधीत केले.
समाजाच्या चित्रपट तसेच विविध क्षेत्रातील गुणवंतांसाठी विशेष सन्मान पुरस्कार तसेच पाऊस या विषयावरील काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानीत करण्यात आले. या सोहळ्यात कवयित्री संगिता जामगे लिखित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच श्रीरामपूरातील साई विठ्ठल अनाथ आश्रमातील गरीब मुलांना शालेय उपयोगी वस्तूंचे वितरण सुद्धा करण्यात आले. तसेच मनजित बतरा पुरस्कृत पर्यावरण पुरक पिशव्यांचे अनावरण करण्यात आले
वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशनच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात
डब्ल्यूसीपीएचे उपाध्यक्ष तथा अर्थतज्ञ, कायद्याचे अभ्यासक नरसिंहा मूर्ती यांनी आपले विचार मांडताना जगातील एकंदरीत घडामोडीवर भाष्य करून सांगितले की, आज जगाची वाटचाल ही युद्धाच्या दिशेने जाताना दिसत आहे. आपल्याला या जगामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी युद्धाची नाही तर शिक्षणाची अत्यंत गरज असल्याचे त्यांनी आपले विचार मांडताना सांगितले. डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ दत्ता विघावे यांच्या कामाचे कौतुक करताना प्रा.नरसिंहा मुर्ती अक्षरशःभारावून गेले.
डब्ल्यूसीपीएचे ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट तथा जेष्ठ गांधीवादी नेता प्रा. ई.पी मेनन यांनी आपले विचार मांडताना आज खऱ्या अर्थाने शिक्षणाची, पर्यावरण संवर्धनाची काय गरज आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवरांनी समर्पक असे मार्गदर्शन करून वर्ल्ड पार्लमेंटच्या या आगळावेगळ्या सोहळ्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला डब्ल्यूसीपीएचे महाराष्ट्र चॅप्टरचे को- ऑर्डीनेटर मेजर अशोक मोहिते यांनी अध्यक्षीय सुचना मांडली तर खजिनदार चिंतामन भोसले यांनी अनुमोदन दिले.
शिक्षण व कायद्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व डब्ल्यूसीपीएशी सामंजस्य करणाऱ्या श्रीरामपूरच्या. खा.गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयास विशेष सन्मान देऊन पुरस्कृत केले. भारतीय संविधानाचा विशेष प्रसार व प्रचार करण्यासाठी दोन्ही संस्था कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्या संघमित्रा राजभोज यांनी केले
याप्रसंगी पाऊस या विषयावर घेतलेल्या आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेतील विजेते श्रीमती. संगिता भाऊसाहेब जामगे (प्रथम) गंगाखेड, परभणी, मेजर अशोक महादेव मोहिते
बार्शी, सोलापूर (द्वितीय), सौ. आश्विनी प्रसन्ना धुमाळ,चितळी (तृतीय), श्री. पद्माकर तुकाराम जाधव, नाशिक (चतुर्थ)
डॉ. विशाखा पंकज भळगट,अहमदनगर (पंचम) यांना सन्मानीत करण्यात आले.
तर मा.श्री किरण सावंत, उपविभागीय दंडाधिकारी श्रीरामपूर विभाग (प्रशासकीय), श्री.शिंदे किशोर प्रभाकर. राहुरी (शिक्षण आणि क्रीडा), श्रीमती मायादेवी अंकुश गायकवाड, मानवत, परभणी (शिक्षण आणि समाजसेवा), सौ.सोनाली सुहास जगताप,वांद्रे (पूर्व), मुंबई,(साहित्य आणि रेखाचित्र), डॉ.मधुकर बाबुराव हुजरे, उस्मानाबाद (समाज सेवा)
अॅड.शहानूर अहमद सय्यद, सोलापूर
(नोटरी / बेस्ट अॅडव्होकेट /सामाजिक कल्याण), सौ.स्मिता गणेश पाटील अलिबाग, रायगड (समाजकार्य),
श्री.अश्विन तुळशीराम सोनकांबळे,सोलापूर
(आरोग्य विभाग / समाज कल्याण),श्री. संजय विश्ववाराव रामटेके, खामगाव, बुलढाणा (शिक्षण आणि सामाजिक कार्य), श्री.गजेंद्र श्रीरंग आवारे, सिल्लोड,औरंगाबाद [कलाकार (चित्रकार)]
जावेद दाऊद मुल्ला, मंगळवेढा, सोलापूर
(वकील), श्री. दशरथ नारायण सुरडकर, सिल्लोड, औरंगाबाद (पत्रकारिता)
श्री. राहुल रामचंद्र जाधव, पुणे
(गायक/छायाचित्रकार/सामाजिक कल्याण) सुश्री वैष्णवी भौसहेब जामगे, मुंबई (फॅशन डिझायनर आणि फिटनेस मॉडेल) यांना “वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२३” देऊन सन्मानीत करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आकाशवाणी अहमदनगरचे नैमित्तीक उदघोषक श्री.प्रसन्नकुमार धुमाळ यांनी अतिशय ओघवत्या व मधुरवाणीने केले. तर आभार प्रदर्शन डब्ल्यूसीपीएचे महाराष्ट्र चॅप्टर सहसचिव श्री. ऋषिकेश विघावे यांनी केले.




