1 min read

खडतर मेहनतीने शिक्षण घेऊन डाॅक्टर बनुन समाजाचे पांग फेडणारे डाॅ. अनिल शिंदे !!

Loading

खडतर मेहनतीने शिक्षण घेऊन डाॅक्टर बनुन समाजाचे पांग फेडणारे डाॅ. अनिल शिंदे !!

अमळनेर तालुक्यात एकमेव सर्जन म्हणून ज्यांचे नाव घेतले गेले ते म्हणजे डाॅ. अनिल शिंदे..अगदी प्रतिकूल परिस्थिती असतांना शिक्षण घेण्याची जिद्द न सोडता वैद्यकिय शिक्षण पूर्ण केले..डाॅ अनिल शिंदे सराकडे अनेक समस्या आल्या परंतू हा ध्येयनिष्ठ जिज्ञासू शिक्षणाचे शिखर गाठू शकले..आपले ग्रामीण भागातील पिळोदे ह्या गावात राहून ते पुढे बाहेर शिकून एम. एस झाले..
डॉक्टरांच्या अमळनेरात येण्याने शस्त्रक्रिया करणारा वैद्य मिळाला. अनेक अवघड शस्त्रक्रिया करणारा धाडसी डाॅक्टर म्हणून त्यांनी ख्याती त्यांना लवकर मिळाली. सामाजिक कामाचे भान असलेल्या व्यक्तिमत्त्वाने अनेक सामाजिक कामे देखील केले..त्यांच्या अनुभवजन्य ज्ञानातून अनेक डाॅक्टरांना मार्गदर्शन मिळाले. अनेकांचे निस्पृह कामे त्यांनी आयुष्यात केली..अनेक माणसे जोडली. आपल्या बहारदार कामातून “नर्मदा मेडिकल फाऊंडेशन “ह्या बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली. ह्या हॉस्पीटलमुळे रूग्णांना अमळनेरात तपासणी व शस्त्रक्रियेची सोय झाली..अनेक माणसांचा गोतावळा डॉक्टरांनी निर्माण केला. लोकांशी संपर्क वाढल्याने राजकिय पक्ष काँग्रेस पक्षाच्या पक्ष बांधणीचेही कामे त्यांनी केली. आपल्या सेवाभावी स्वभावाने अनेक आरोग्यदायी शिबिरे गरजूंसाठी विनामूल्य घेतली..कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालकपदी त्यांनी भूषविले आहे..माऊली इन्स्टूमेंट ऑफ टेक्नॉलॉजी अमळनेर हि संस्था सुरू केली.सध्या नामांकित काॅलेज प्रताप येथे सध्या कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत..त्यांनी तिथेही कल्पकता दाखवून नाविन्यपूर्ण शिक्षण करण्याचा ध्यास घेतला आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला आरोग्य शिबीर घेण्यात आले. डाॅक्टर हे धर्मनिरपेक्ष विचाराचे आहेत..त्यांनी आपले जावई डॉ संदिप जोशी व मुलगी डॉ मयुरी जोशी यांच्या सहकार्यातून कोरोना काळात अप्रतिम सेवा दिली..त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले… दादासाहेब डॉ अनिल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन शब्द…

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !
ईश्वर आपणांस दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणांस हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..

जाहिरात….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *