1 min read

प्रा.डॉ.विद्या पाटील यांचा डॉ.कलाम पुस्तक भिशी तर्फे सत्कार

Loading

प्रा.डॉ.विद्या पाटील यांचा डॉ.कलाम पुस्तक भिशी तर्फे सत्कार

महाराष्ट्र शासन संकल्पित मराठी भाषा विद्यापीठ,रिद्धपूर ,जि.अमरावती घोषित सहा सदस्य गठीत समिती सदस्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातून एकमेव सन्माननीय नियुक्ती मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.विद्या रत्नाकर पाटील ( व्यवहारे ) यांची करण्यात आली आहे.डॉ.विद्या पाटील यांच्या गौरवार्थ भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव तर्फे यांचा सत्कार महाविद्यालयाच्या मराठी विभाग कक्षात २१ जुलै २०२३ रोजी करण्यात आला.
डॉ.विद्या पाटील – व्यवहारे यांचा भावपूर्ण सत्कार पुस्तक भिशीचे संस्थापक मार्गदर्शक तथा माजी निवृत्त शिक्षण उपसंचालक ( प्राथमिक विभाग ) शशिकांत हिंगाणेकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ तसेच पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांच्या हस्ते पुस्तक सादर भेट देऊन संयुक्तपणे करण्यात आला.
ज्येष्ठ सुप्रसिद्ध कवी शशिकांत हिंगोणेकर हे मुलजी जेठा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याने महाविद्यालयाच्या शैक्षणिक व वाड़मयीन उज्ज्वल परंपरांचा आपल्या विद्यार्थी दशेतील सुखद आठवणींना उजाळा दिला.तसेच त्यांना घडविणाऱ्या स्वर्गीय प्रा.राजा महाजन व प्रा.सु.का जोशी,प्रा.इंदुमती लिमये या तत्कालीन गुरुवर्यांची अध्यापन कौशल्ये व प्रेरणादायी मातृपितृवत्सलता,औदार्य व गुणग्राहकता संदर्भात कृतज्ञता व्यक्त केली.मराठी विभाग प्रमुख डॉ.विद्या पाटील – व्यवहारे यांनी मराठी विभागातर्फे राबविलेल्या उपक्रमांची यशस्वीता व जिल्ह्यातील साहित्यिक चळवळी संदर्भात हिंगोणेकरांशी सुसंवाद केला.मराठी विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉॅ.सुभाष महाले आणि प्राध्यापक गोपीचंद धनगर यांच्याशी विजय लुल्हे यांनी पुस्तक भिशीचे उद्दिष्ट्ये,प्रयोजन तसेच कार्यवाही बाबत हितगुज केले.याप्रसंगी प्रा.महाले व प्रा.धनगर यांनी संकल्पित वाङ्मयीन प्रकल्पां संदर्भात सांगोपाग चर्चा केली.पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांच्या विनंती नुसार डॉ.विद्या पाटील – व्यवहारे मॅडम यांनी डॉ.ए.पी. जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीसाठी ‘ जात्यांवरील ओव्यां व लोकगीतांमधील स्त्रियांची संस्कृती आणि समर्पण ‘ या विषयानुषंगे ऑन लाईन कार्यक्रम देण्याची सहर्ष अनुमती दिली.
ज्येष्ठ साहित्यिक कवीवर्य शशिकांत हिंगोणेकर यांनी स्वलिखित कविता संग्रह ‘ बेट बंद भावनांचे ‘ व ‘ अंतर्बाह्य ‘ तसेच धर्मपत्नी सौ.उषा हिंगोणेकर लिखित ‘ धगधगते तळघर ‘ काव्यसंग्रह डॉ.ज्योती पाटील यांना सादर भेट देऊन अभिनंदन केले.याप्रसंगी मराठी विभागाचे प्रा.अतुल पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *