1 min read

दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा वंजारी खुर्दला बँक ऑफ बडोदा शाखा पारोळा वर्धापन दिनानिमित्त सात ग्रीन बोर्ड क्लास रुमसाठी सप्रेम भेट

Loading

दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा वंजारी खुर्दला बँक ऑफ बडोदा शाखा पारोळा वर्धापन दिनानिमित्त सात ग्रीन बोर्ड क्लास रुमसाठी सप्रेम भेट

अमळनेर प्रतिनिधी
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा वंजारी खुर्द तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथे बँक ऑफ बडोदा शाखा पारोळा 116 वा वर्धापन दिनानिमित्त 7 (सात) ग्रीन बोर्ड क्लास रुमसाठी सप्रेम भेट देण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर (अध्यक्ष चामुंण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा) समवेत,श्री.कैलास महाजन, अमळनेर हे होते.तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. योगेश कैकडे साहेब, समवेत श्री.जीवन राजपूत साहेब,श्री.सतीश ठाकूर साहेब,श्री.हर्षल चौधरी साहेब हे होते.उपस्थितांचा स्वागत संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी विशेष विद्यार्थी समवेत सौ.सविता पाटील,सौ.वैशाली पाटील, सौ.संगिता मॅडम यांनी स्वागत गीत व भक्ती गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यांनी संस्थापक अध्यक्ष व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले.श्री.जीवन राजपूत साहेब व श्री.हर्षल चौधरी साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले व दिव्यांग सेवेबाबत संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर यांचे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रताप पाटील सर यांनी तर आभारप्रदर्शन प्रदर्शन हेमंत महाजन सर यांनी केले व शाळेची माहिती मनिष किसन जाधव (मुख्याध्यापक) यांनी दिली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *