1 min read

जळगाव येथील पुरस्कारार्थींना उज्जैनकर फाउंडेशन तर्फे निवड पत्र प्रदान

Loading

जळगाव येथील पुरस्कारार्थींना उज्जैनकर फाउंडेशन तर्फे निवड पत्र प्रदान

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे या वर्षाचे तापी पूर्णा राज्यस्तरीय साहित्य व इतर पुरस्कार पूर्वीच जाहीर झालेले होते ते पुरस्कार 27 ऑगस्ट 2023 रोजी ए.के. नॅशनल हायस्कूल खामगाव येथे आयोजित दुसरे राज्यस्तरीय शिव बाल,किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार त्यात जळगाव जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत बडगुजर यांचे चिरंजीव श्रीमद बडगुजर याने दोन वर्षांपूर्वी लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सर केले होते त्यावर आधारित त्याने माझे कळसूबाई शिखर सर करण्याचा रोमांचकारी अनुभव हे पुस्तक प्रकाशित केले त्या पुस्तकाला तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याचप्रमाणे जळगाव येथील संघर्ष दिव्यांग बहुउद्देशीय संस्था चे अध्यक्ष श्री गणेश पाटील तसेच साहित्यिक किशोर नेवे यांच्या दिव्य ज्योत या काव्यसंग्रहाला सुद्धा पुरस्कार जाहीर झालेला आहे या सर्वांना जळगाव येथील संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रामध्ये डॉ. शिवचरण उज्जैनकर तसेच बुलढाणा जिल्हा समन्वयक श्री पांडुरंगजी दैवज्ञ साहेब तसेच बुलढाणा जिल्हा सचिव श्री शंकरराव
अनासुने सर यांनी या पुरस्कारा र्थींना निवड पत्र प्रदान केले याप्रसंगी फाउंडेशनचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत बडगुजर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला प्रसंगी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोर पाटील यांनी या प्रसंगी प्रास्ताविक सादर केले व खामगाव येथे होऊ घातलेल्या संमेलना मध्ये या पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात येईल व जास्तीत जास्त संख्येने या संमेलनाला उपस्थित राहण्याचे त्यांनी या प्रसंगी आव्हान केले.
याप्रसंगी जळगाव जिल्हा सल्लागार श्री मधुकरराव पोतदार साहेब त्याचप्रमाणे दिव्यांग संघर्ष बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री गणेशभाऊ पाटील उपाध्यक्ष श्री जितेंद्रभाऊ पाटील आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी 27 ऑगस्ट 2023 रोजी ए.के. नॅशनल हायस्कूल खामगाव येथे उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केलेले आहे याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोर पाटील यांनी केले.
याप्रसंगी फाउंडेशनचे जळगाव जिल्हा शाखेचे महिला संपर्कप्रमुख ज्योतीताई राणे त्याचप्रमाणे साहित्यिक श्री किशोर नेवे यांच्या निवासस्थानी सुद्धा भेट देण्यात आली श्री किशोर नेवे यांच्या दिव्य ज्योती या काव्यसंग्रह सुद्धा फाउंडेशनचा पुरस्कार असून याप्रसंगी त्यांना सुद्धा त्यांच्या निवासस्थानी फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा समन्वयक श्री पांडुरंग दैवज्ञ साहेब यांच्या शुभहस्ते त्यांना निवड पत्र प्रदान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *