1 min read

महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या उपस्थितीत महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात चांद्रयान मोहीम-3 चे थेट प्रक्षेपण …

Loading

महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या उपस्थितीत महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात चांद्रयान मोहीम-3 चे थेट प्रक्षेपण विद्यालयातील डिजिटल रूम मध्ये विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.

आज महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या उपस्थितीत महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात चांद्रयान मोहीम-3 चे थेट प्रक्षेपण विद्यालयातील डिजिटल रूम मध्ये विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.या प्रसंगी महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,भारत देशाच्या गौरवात आज पुन्हा एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. चंद्रयान-३ ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची नियोजित तिसरी चंद्र शोध मोहीम आहे. यात चांद्रयान-२ प्रमाणेच लँडर आणि रोव्हर असेल, परंतु ऑर्बिटर नसेल. त्याचे प्रोपल्शन मॉड्यूल कम्युनिकेशन रिले उपग्रहासारखे वागेल. अंतराळयान हे १०० किमी चंद्राच्या कक्षेत येईपर्यंत प्रोपल्शन मॉड्यूल हे लँडर आणि रोव्हर घेऊन जाईल.
एल.व्ही.एम३ एम्४ – चंद्रयान ३ चे प्रक्षेपण वाहन, श्रीहरिकोटा २२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित केलेली चंद्रयान-२ मोहीम ६ सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर अंशतः अयशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने नियोजित चंद्रयान-३ मोहीम हाती घेतली होती. चंद्रयान-३ चे प्रक्षेपण १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २:३५ वाजता करण्यात आले.
इस्रोने चंद्रयान-३ मोहिमेसाठी तीन मुख्य उद्दिष्टे निश्चित केली आहेत, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे:चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर सुरक्षितपणे उतरवणे.
चंद्रावर रोव्हरच्या फिरण्याच्या क्षमतेचे निरीक्षण आणि प्रात्यक्षिक.चंद्राची रचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रासायनिक आणि नैसर्गिक घटक, माती, पाणी इत्यादींवर वैज्ञानिक प्रयोग करणारे इन-साइट वैज्ञानिक निरीक्षण. इंटरप्लॅनेटरी म्हणजे दोन ग्रहांमधील मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रात्यक्षिक केले गेले.

सदर प्रसंगी धुळ्याचे प्रथम नागरिक महापौर सौ प्रतिभाताई चौधरी , विद्यालयाच्या प्रधानाचार्य सौ सुचिता भंडारी, जेष्ठ शिक्षक श्री.नरेंद्र पाटील, डॉ. किशोर अरगडे, श्री इंद्रजीत जमादार, श्री.योगेश शिंदे, सौ.सोनाली सिसोदिया ,श्रीमती संगीता कुंवर, श्री निलेश राजपूत ,प्रा.श्री.सागर चौधरी ,श्री रवींद्र राजपूत आणि इयत्ता 8 ते 10 वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते , या सर्वांनी एकत्रित समवेत प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. सदर प्रसंगी या चंद्रयानाची सविस्तर माहिती , विवेचन सौ.सुचिता भंडारी आणि श्री.इंद्रजीत जमादार यांनी केले. तसेच मा. सौ.प्रतिभाताई चौधरी यांनीही भारताच्या सामर्थ्यशाली असलेली ही कामगिरी अभिमानास्पद असून सर्व भारतीय शास्त्रज्ञांचे परिश्रम व प्रयत्न यांचे अभिनंदन केले. तसेच या मोहिमेद्वारे आपण शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून शालेय जीवनापासून प्रगती करावी असेही आवाहन केले. श्री जमादार सर तसेच मुख्याध्यापिका सौ भंडारी मॅडम डॉक्टर श्री आरागडे यांनीही चंद्रयान मोहिमेचे वैशिष्ट्ये व त्याची कारण मीमांसा याबाबत आपल्या मनोगतातून विवेचन करून विद्यार्थ्यांना माहिती दिली विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री नरेंद्र पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *