1 min read

कळमसरे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!!!प्रयत्नांच्या पराकाष्टेला अखेर मिळाले यश !!!!

Loading

कळमसरे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!!!

प्रयत्नांच्या पराकाष्टेला अखेर मिळाले यश !!!!

अमळनेर प्रतिनिधी

कळमसरे ता. अमळनेर येथील आमचे वर्गमित्र योगेश मधुकर देवरे (पाटील) याची अमेरिका येथील Granules pharmaceuticals Inc मध्ये निवड.
कुटुंबामध्ये कुठलीही शैक्षणिक पार्श्वभुमी नाही, वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी योगेश चे पितृ छत्र देखील हरवले परंतु आपल्या परिस्थितीला न डगमगता परिस्थितीशी संघर्ष करत शिक्षण घेतले , आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर योगेशने मोठी झेप घेतली, अगदी लहान पणा पासुन हुशार, संयमी, प्रामाणिक, मितभाषी अशी त्याची ओळख आहे. तो कळमसरे येथील कै. मधुकर किसन पाटील यांचा लहान चिरंजीव आहे.
योगेश चे 1 ली ते 4 थी प्राथमिक शिक्षण आपल्याच गावातील जि. प. प्राथमिक मुलांची शाळा येथे झालेले आहे, व 5 वी ते 10 वी शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे त्यानंतर प्रताप महाविद्यालय अमळनेर येथून 12 वी सायन्स पर्यन्त शिक्षण घेतले, त्यानंतर नंदुरबार येथील जिजामाता कॉलेज ऑफ फार्मसी येथून 2019 साली B. Pharm पदवी संपादन केली, मागील तीन वर्षापासुन तो गोवा येथील Lupeen Pharmaceuticals येथे प्रॉडक्शन ऑफिसर म्हणून कार्यरत होता. आता अमेरीका येथे निवड झालेली आहे, त्याच्या या निवडीने मित्र परिवार, आप्तेष्ट मंडळी, नातेवाईक सगळ्यांमधे आनंदाचे वातावरण निर्माण झालेल आहे, त्याच्या या शैक्षणिक प्रवास व यशामध्ये त्याचे मोठे बंधू मनोहर पाटील व आई यांचा खूप मोठा वाटा आहे. मोठे बंधू हे देखील खोपोली येथील नामांकित कंपनी मध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत. आज दिनांक 14-जुलै – 2023 रोजी संध्याकाळी 05:30 वाजेला योगेश मुंबई विमानतळावरून अमेरिका वॉशिंग्टन साठी रवाना होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *