गडखांब केंद्रात विद्या समीक्षा केंद्राच्या प्रशिक्षण संदर्भात केले मार्गदर्शन..
![]()






गडखांब केंद्रात विद्या समीक्षा केंद्र प्रशिक्षण संदर्भात प्रशिक्षण शिबीर संपन्न
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील गडखन केंद्रात विद्या समीक्षक केंद्र प्रशिक्षण व शाळा पूर्व तयारी या संदर्भात केंद्रस्तरीय सविचार सभा जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथमिक शाळा गडखांब तालुका अमळनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
अध्यक्षस्थानी केंद्राचे केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील होते. अगोदर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. केंद्र शासनाच्या माध्यमातून 15 जुलैपासून शिक्षक विद्यार्थी हजेरी स्वीप अँप च्या अंतर्गत घेतली जाणार आहे .त्याद्वारे शालेय पोषण आहार, सरल माहिती शाळेच्या संदर्भातील सर्व ऑनलाईन माहिती यामधून उपलब्ध असणार आहे। विद्यार्थी स्वाध्याय या संदर्भात व शाळेतील गुणवत्ता याची सर्व माहिती केंद्र सरकारला मिळणे सोपे होणार आहे.
अँप कसे डाऊनलोड करावे,विद्यार्थी व शिक्षक माहिती कशी भरावी याबाबत सविस्तर माहिती केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील ,उपक्रमशील शिक्षक खेमचंद पाटील ,नीरज पाटील, कमलेश मोरे यांनी दिली.
प्रस्ताविक गडखांब केंद्राचे नीरज पाटील यांनी केले. यावेळी देवगाव देवळी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, ग्रेडेड मुख्याध्यापक अरविंद सोनवणे,सौ प्रतिभा बोरसे ,बागुल सर,देवळी हायस्कूलचे शिक्षक ईश्वर महाजन व गडखांब केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक बंधू व भगिनी उपस्थित होते.

