1 min read

लोकप्रतिनिधीवरची विश्वासाहर्ता होतेयं कमी….

Loading

लोकप्रतिनिधीवरची विश्वासाहर्ता होतेयं कमी….
राजकारण ही अनेक व्यक्तींनी एकत्रितरीत्या निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक राष्ट्रामध्ये सत्ता मिळविण्यासाठी व देश चालविण्यासाठी अनेक नेते जे निर्णय घेतात व जे काम करतात त्यास राजकारण म्हणतात. राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही.राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे. राजकारणाचा हेतू खूप मोठा आहे. दुर्दैवाने आपण तशा व्यापक अर्थाने त्याच्याकडे पाहत नाही…..
राजकारण फक्त निवडणुकीपुरतं किंवा लढायांपुरतं मर्यादित नाही. राजकारणाला विचार असणं व त्या विचारांना मूल्यांचा आधार असणं व हेतू असणं आवश्यक आहे. राजकारणाला काही श्रद्धा व हेतू असणं आवश्यक आहे.असा विचार प्रत्येक नागरिकाने व राजकारण्यांनी ठेवणं गरजेचं आहे.
आपल्याला काय करायचंय हे आधी निश्चित करायला हवं,आपली दिशा पक्की असायला हवी.आपण सर्व नागरिकांनी सर्वांनी मिळून एक मोठ्या माणुसकीचं व जगात शांतता नांदेल,प्रत्येक हाताला काम मिळेल,शेतकरी सधन होईल असं काम करणं व ती व्यवस्था निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे तेव्हाच अखंड राष्ट्र सुखी झाले असे म्हणता येईल.
राजकारण हे केवळ निवडणुकी पुरता मर्यादित नाही . सध्याचे राजकारण देशातील अत्यंत विकृतीची आहे.. खालच्या स्तरावरील आहे .सध्याच्या राजकारणावर लहानापासून तर अबाल वृद्धांपर्यंत अत्यंत खालच्या स्तरावर टीका होते याला जबाबदार शासन व राज्यकर्ते आहेत…
सध्या महाराष्ट्रात भाजप फोडाफोडीचे राजकारण करीत आहे एकीकडे शिवसेना फोडली शिवसेनेचे 40 आमदार भाजपला सपोर्ट करत सरकार स्थापन केले..व एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले.. याच्या विरोधात शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे व त्यांचे आमदार ,खासदार सुप्रीम कोर्टात गेले आहे,, कोर्टात तारीख पे तारीख खेळ सुरू आहे… याकडे
जनतेचे लक्ष लागलेले आहे… न्यायदेवता योग्य न्याय करेल अशी महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेची इच्छा आहे.. सुप्रीम कोर्टानेही शिंदे सरकारला फटकारले आहे चाळीस आमदार म्हणजेच पक्ष नव्हे पक्षाची स्वतंत्र राज्यघटना असते. पक्षांमध्ये घटनेनुसार ज्याच्याकडे बहुमत असते त्याच्या पक्ष असतो ही सांगितले आहे. आता न्यायदेवताच बंडखोरांना पात्र करेल अशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला प्रतीक्षा आहे…
एकनाथ शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षावर वर युती केल्यामुळे आम्ही पक्षातून बाहेर पडलो असे कारण दिले होते आम्ही राष्ट्रवादीचे अजित पवार बरोबर बसू शकत नाही असे एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितली होती या घटनेला वर्षी झालं आणि भाजपने राष्ट्रवादी फोडली. राष्ट्रवादीचे अजित पवार छगन भुजबळ धनंजय मुंडे हसन मुश्रीम सारखे ती सामना देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये सामील झाले…अजीत पवार यांनी उपमुख्यमंत्री व इतर आठ मंत्र्यांनी शपथ पण घेतली….
एकीकडे भाजपचा किरीट राष्ट्रवादी, शिवसेना, काग्रेस या पक्षाच्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना तुरूंगात पाठवणे हा त्यांचा खेळ सुरू आहे..मग ते भष्टाचारी आहेत तरी भाजपने यांना सत्तेमध्ये कसे घेतले असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे.. भाजपच्या गटात मोठी खदखद सुरू आहे भाजपमध्ये जे एकनिष्ठ आहेत ..इतक्या वर्षापासून प्रामणिकपणे पक्षात काम करीत आहेत..
त्यांना कोणत्याच प्रकारचे पद नाही व बाहेरून आलेल्या लोकांना लगेच पदे दिले जातात.. मंत्री केले जातात… अशी सर्वसामान्य भाजप नेत्यांची प्रतिक्रिया आहे…
असाच प्रकार शिंदे सरकारच्या मंत्र्यांमध्ये आमदारांमध्ये आहे शिंदेच्या काही आमदारांना भाजपने मंत्रिपदाचे प्रलोभन दिले होते पण अजूनही त्यांच्या शपथविधीला मुहूर्त मिळत नाही ..अजित पवार गटातल्या नव्या आमदारांचा शपथविधी होतो हे शिंदे सरकारमधील सर्व आमदार खासदार पाहत आहे.. त्यांच्यामध्येही मोठी खदखद वाढली आहे… व ते आता प्रतिक्रिया देत आहे आम्ही भाजपला साथ दिल्याने भाजपने आमचा गेम गेला असे बोलून दाखवत आहे… पुढे कोर्टाने शिंदे सरकारच्या व गटातील काही आमदारांना अपात्र केले तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अजित पवार होईल व शिंदे व त्यांचे बंडखोर आमदार बाराच्या भावात जातील अशी सध्या तरी महाराष्ट्रात जनतेमध्ये चर्चा सुरू आहे व देशातील व राज्यातील नामवंत वकील यांनी पण शिंदे व त्यांचे बंडखोर आमदार अपात्र होतील ही काळया दगडावरची रेष आहे असे सांगितले आहे. हे भाजपला पण माहित आहे..यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी खेडी करून राष्ट्रवादी फोडली व अजित पवारांचा सरकारला सपोर्ट असावा म्हणून सत्तेत घेतले व उपमुख्यमंत्री पद दिले व जे अर्थ खात्याला शिंदे सरकारचा विरोध आहे तेच अर्थ खाते अजित पवार कडे येणार हे निश्चित झाले आहे व तसा अजित पवारांनी भाजपकडून शब्द घेतला आहे. सध्या शिंदे व त्यांचे बंडखोर आमदार खासदार अपक्ष आमदार यांची मोठी खदखद वाढली आहे उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये असताना मंत्रीपद होते आता तर काहीच नाही… भाजपने आमचा गेम केला .. अपक्ष आमदार व प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी बोलून दाखवलेले आहे…
83 वर्षाचे शरद पवार यांनी आपला पक्ष संघटनावर भर देऊन राज्यातील दौरा व जनतेशी संपर्क साधत आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जनतेची संपर्क साधून येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करत आहे येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत शरद पवारांना की अजित पवारांना साथ जनता देईल येणारा काळ ठेवेल तसेच शिवसेनेतून बाहेर पडलेले शिंदे व त्यांचे 40 आमदार यांना जनता साथ देईल का? उद्धव ठाकरेंना साथ देईल?हा प्रश्न जनतेच्या दरबारात आहे..
सध्या तरी महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत विकृतीचे ईडी ,सी .बी.आय याचा भाग दाखवून राजकारणी लोकांचे आयुष्य संपवण्याचा कुटिल डाव भाजप खेळत आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होतो जे देशाचे पंतप्रधान मोदी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचा आरोप करत होते.. त्याच भ्रष्टाचार्यांना अभय देऊन सत्तेमध्ये आणले यात भाजपचे कोणतं गौडबंगाल आहे . भाजपचे हिंदुत्व कुठे गेले? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे..
सत्तेसाठी हपापलेले नेते व विकृत राजकारण ,फोडाफोडीचे राजकारण याची चर्चा संपूर्ण देशात आहे.. सध्या खोक्यांचे सरकार असल्यामुळे सर्वसामान्य मतदारांच्या मताला किंमत उरलेली नाही.. निवडणुकीत मतदान करावे किंवा नाही असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडला आहे.. सरकारला मतदारांशी काही देणे घेणे ही नाही…
साडेतीन वर्षात एकाच वेळी तीन शपथविधी होतात हे महाराष्ट्र सरकारचे अपयश आहे का ..जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सत्तेसाठी जर असे खेळ करत असतील तर भविष्यात लोकशाही धोक्यात आहे ..मतदारांनी जागे होऊन अशा विकृत प्रकारच्या राजकारणाला दावणीला बांधणाऱ्या पक्षाला सत्तेतून हद्दपार करणे हाच त्याचा एकमेव उपाय आहे.. सध्या भाजप विरोधी पक्ष संपवण्याच्या मार्गावर लागला आहे का? विरोधी पक्ष हा सत्ताधारींवर वचक ठेवण्यासाठी असतो.. अगोदर देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते यांच्या सरकारमध्ये विरोधी पक्ष व त्यांच्यामध्ये आपलेपणा होता पण सध्या तसा दिसत नाही.. उलट विरोधी पक्ष वाल्यांना त्रास देऊन त्यांना तुरुंगात टाकण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत हे केव्हा थांबेल असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे… महाराष्ट्रात व इतर राज्यात जो खेळ सुरू आहे. भाजपला पुन्हा देशाचा पंतप्रधान मोदींना करायचा आहे का? जरूर करा.. पण विकृतीचे राजकारण करून जनतेच्या मनातील रोष ओढून घेऊ नका.. विरोधी पक्षाशी पण चांगले संबंध ठेवा हीच भावना सर्वसामान्य मतदारांची व जनतेची रास्त अपेक्षा आहे …

लेखक
ईश्वर आर महाजन
पत्रकार अमळनेर
9860352960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *