1 min read

मानवसेवा हीच ईश्वरसेवा या संकल्पनेनुसार “एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाकडून होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Loading

मानवसेवा हीच ईश्वरसेवा या संकल्पनेनुसार “एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाकडून होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
महाकवी कालिदास स्मृती, रिम झिम काव्य संमेलन २०२३ सन्मान” पुरस्कार देऊन प्रा.प्रकाश माळी व डॉ. मनिलाल शिंपी यांचा सन्मान. मुंबई,ठाणे( प्रतिनिधी):,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या संकल्पनेनुसार, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील,आणि उत्कृष्ट प्रशासक ,संघटक आदरणीय ए.जी.पाटील( आप्पा) यांचा विशेष प्रयत्नाने
राजा बहादुर हिंदी प्राथमिक विद्यालयातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षनिक साहित्य वाटप करण्यात आले. आपली आजची येणारी पिढी ही खर्‍या अर्थाने भारताच भविष्य आहे. आणि आज अनेक ठिकाणी अर्थकारणामुळे अनेकांना आपल शिक्षण अर्ध्यात थांबवावं लागत आहे.असे विधान ए.जी पाटील यांनी चिमुकल्यांना शुभेच्छा देताना केले.त्यातूनच अनेक ठिकाणी शिकण्यासाठी योग्य साधनांची पूर्ती नाही झाली की ते शिक्षण थांबवावं लागत आहे. अशाच काही मुद्द्यांवर लक्ष असा उपक्रम खान्देश मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी हाती घेतला असल्याचे सांगितले.उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे आज गुरुवारी दिनांक ०६/०७/२०२३ रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गरजू गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सोप्या वाटेवर चालून एखाद्याला मदत करणे तितकेसे अवघड नसते पण एखादी आडवाट शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे तितकेच अवघड असते
“एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ”
आपण समाजाचे देणे लागतो आणि या भावनेतूनच उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ सातत्याने नवनवीन उपक्रम राबवून समाजातील वंचित,होतकरू आणि गरजू घटकांना सक्षम बनविण्यास नेहमीच कटीबद्ध असते.
डॉक्टर रेखा बहनवाल यांनी श्री विकास पाटील यांना हिंदी हायस्कूल जोशीबाग कल्याण शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची गरज आहे आणि आपल्या मार्फत या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात यावे अशी विनंती केली..
त्या अनुषंगाने रावबहादुर हिंदी प्राथमिक स्कूल जोशीबाग कल्याण पश्चिम या शाळेतील १२५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
.ज्ञानेश्वर धात्रक साहेबांनी वह्या तर मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील सर यांनी पेन्सिल व खोडरबर उपलब्ध करून दिले.
मंडळाच्या वतीने दोघांचेही हार्दिक आभार.
सदर कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उपाध्ये मॅडम डॉक्टर रेखा बहनवाल उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील , कोषाध्यक्ष ए.जी आप्पा पाटील ,खान्देश विकास मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. प्रकाश माळी, अनिरुद्ध चव्हाण, प्रवीण सनेर , डॉ.मनिलाल शिंपी आणि शाळेतील सर्व शिक्षक वृंद इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी खान्देश प्रेमी गायक, कवी प्रा. प्रकाश माळी व मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मणिलाल शिंपी यांना महाकवी कालिदास स्मृति प्रित्यर्थ,” रिम झिम काव्य संमेलन सन्मान २०२३ “” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच साप्ताहिक कल्याण नागरिक चे संपादक , मच्छिंद्र कांबळे यांनी औचित्य साधून, डॉ. मनिलाल शिंपी यांचा, मानवसेवेचे देवदूत म्हणून ,आदर्श कल्याणकर २०२३ “पुरस्काराचे सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *