1 min read

सामाजिक उत्तरदायित्वाने कर्तव्य पूर्तीचा आनंद समाजभान जपणारा असतो.
अशोक वाघेला

Loading

सामाजिक उत्तरदायित्वाने कर्तव्य पूर्तीचा आनंद समाजभान जपणारा असतो.
अशोक वाघेला

जीवनामध्ये आपल्या जगण्याच्या दिशा या अत्यंत महत्त्वाच्या असताना सामाजिक उत्तरदायित्व हे आपल्या जगण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानलं पाहिजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जोपासत जगण्याच्या आणि जीवनाच्या आमुलाग्र दिशा बदलवत समाज मनाला एक नवं वलय प्राप्त करून देण्यासाठी जे प्रयत्न केले ते सर्वश्रुत असेच आहे या प्रयत्नातून चळवळीत योगदान देणाऱ्या आणि आपल्या कर्तव्य पूर्तीचा सर्वार्थाने आनंद घेणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी समाजभान जपत सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव आपल्या जीवनामध्ये ठेवण्याची अत्यंत गरज असल्याचे मत बँक ऑफ बडोदाचे क्षेत्रीय प्रबंधक अशोक वाघेला यांनी आपल्या पदोन्नती निमित्त आयोजित निरोप समारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनक्रांती मोर्चाचे राज्याध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे होते त्यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना समाजशील असं व्यक्तिमत्व आपल्या समाजासाठी आदर्शव्रत बाबी निर्माण करत असताना आपल्या जगण्यातून जीवनातून समाजाचं देणं लागत असतो आणि यातून गोरगरीब वंचित उपेक्षित यांच्या जीवनमानाला उंचावण्यासाठी जो प्रयत्न होत असतो तो प्रयत्न खऱ्या अर्थानं समाज घडवणारा असा असतो आणि ही समाज घडविण्याची प्रक्रिया नोकरदार उद्योजक आणि समाजभान जपणाऱ्या नागरिकांकडून अपेक्षित असल्याने समाज एक संघ राहण्याकरता जबाबदारीची जाणीव ठेवत मार्गक्रमण करण्याची खरी आवश्यकता असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाप्रसंगी डॉ.मिलिंद बागुल यांनी समयोचीत मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन बापूराव पानपाटील यांनी तर आभार हरिश्चंद्र सोनवणे यांनी मानले. जयसिंग वाघ,दिलीप सपकाळे,श्रीकांत बाविस्कर,चेतन ननावरे,अनिल सुरडकर,सुनील सोनवणे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास दिलीप सपकाळे,प्रितीलाल पवार,भाऊराव इंगळे,युवराज सुरवाडे,सोमा भालेराव,अमोल कोल्हे,विवेक जावळे,कृष्णा सपकाळे व अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *