रामदास वाकोडे(पोलिस निरीक्षक, पारोळा) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फळे व मिठाई वाटप,
![]()
दि.03/07/2023 रोजी चामुंण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव येथे आज गुरु पौर्णिमा तसेच मा.श्री.रामदास वाकोडे साहेब (पोलिस निरीक्षक, पारोळा) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष विद्यार्थ्यांना फळे, मिठाई , वाटप करण्यात आली.यावेळी मा.श्री.वाकोडे साहेब यांचे औक्षण आमच्या शाळेचा विशेष विद्यार्थी चि.प्रधान याचे हस्ते करण्यात आले.मा.साहेब खुप भाराऊन गेले.यानंतर चि.प्रधान याने साहेबांच्या वाढदिवसाचे गाणे म्हटले आणि गाणे सोबत केक देखील कापला.मा.अण्णासाहेब.योगेश रघुनाथ महाजन सर संस्थापक अध्यक्ष,यांचे मार्गदर्शनानुसार श्री.रामदास वाकोडे साहेब (पो.नि, पारोळा) यांचा सत्कार मनिष किसन जाधव, (मुख्याध्यापक) यांच्या हस्ते करण्यात आला.मा.साहेब यांनी आपला मौल्यवान वेळ विद्यार्थ्यांसोबत घालवला.सर्व विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद निर्माण केला.मा.वाकोडे साहेब यांनी आपल्या हस्ते सर्व मुलांना केक,फळं व मिठाई वाटप केली.सुत्रसंचलन श्री.जगदिश सोनवणे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.हेमंत महाजन सर यांनी केले.यावेळी हेड.कॉ.महेंद्र मराठे साहेब तसेच रामकृष्ण शेलकर सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



