1 min read

रायगड जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोकण शिक्षक आमदार मा.श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा झंझावती दौरा….

Loading

रायगड जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोकण शिक्षक आमदार मा.श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा झंझावती दौरा….

मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी)३ जुलै २०२३ रोजी कोकण शिक्षक विभागाचे आमदार श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी रायगड जिल्हा परिषद अलिबाग ( टिपणीस हॉल) येथे शिक्षक व शिक्षकेतरांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक घेतली. यावेळी अनेक सामुहीक आणि वैयक्तिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. सर्व प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे हीत हे अंतिम या तत्वास लक्षात घेवून प्रशासन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांस कारवाई करण्याचे आदेश दिले या बैठकीतील महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे :
रायगड जिल्ह्यातील
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे खाजगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
अनुकंपा, नियुक्ती, अनुदान, ६ फेब्रुवारी २०१२ नुसार एनओसी ची अट रद्द करणे, वैद्यकीय प्रलंबित बिले, खोपोली नगरपरिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळांचे प्रश्न, सेवा जेष्ठता यादी, वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी, प्राथमिक केंद्रप्रमुख यांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी बाबत प्रस्ताव,
सेवा निवृत्त शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करणे बाबत, अल्पसंख्यांक शाळांचे प्रश्न इत्यादी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले.
बैठकीस प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती गुरव मॅडम, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती शिंदे मॅडम व अधिकारी वर्ग तसेच संघटनेचे रविंद्रनाथ पाटील (बाळूसर) , रोशन तांडेल, श्री.राजेंद्र पवार,.फरिदुल काजी,.हितेंद्र म्हात्रे,.नामदेव फापाळे, .दिपक मोकल, बबन पाटील, सुरेश मोकल, दिलिप म्हसे,संजय गायकवाड, अविनाश कदम,विशाल पाटील, अनंत पाटील, बडेकर यांचेसह सरांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे आणि १०० / १२५ शिक्षक बंधु-भगीनी उपस्थित होते.
मा.आमदार श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी आपला बहुमुल्य भरपुर वेळ देऊन कामांचा धडाका लावल्याबद्दल रायगडतर्फे त्यांना धन्यवाद व आभार !
रविंद्रनाथ पाटील, पेण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *