महाराष्ट्रात राजकीय भूकंप
![]()

महाराष्ट्रात राजकीय भूकंप
(मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे)
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी ज्यांच्याकडे कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती ते प्रफुल्ल पटेल देखील आता राजभवनावर दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 आमदारांचा पाठिंबा अजितदादा पवार यांना आहे. पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनावर पोहोचले आहेत. महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा भूकंप झालेला आहे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा फुटलेली आहे महाविकास आघाडीचा आता नेमकं काय होणार? असा प्रश्न पडला आहे. राष्ट्रवादीचे 30 ते 40 आमदार अजित पवारांसोबत आहेत अशी माहिती मिळते 30 ते 40 जण मग याचा अर्थ असा की 40 जर आकडा पकडला तर 14 आमदाराचा राष्ट्रवादीकडे राहणार.
अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची तर छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार आहे राष्ट्रवादीच्या 30 ते 40 आमदारांचा पाठिंबा हा अजित पवार यांना आहे तर दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ हे महत्त्वाचे नेते धनंजय मुंडे सहभागी झालेले आहेत., अजित पवार हे आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत अजित पवार यांचा गट आता सरकारमध्ये सहभागी होणार आहे महाराष्ट्रात आता देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने अजितदादा पवार हे सुध्दा उपमुख्यमंत्री राहणार आहेत.

