1 min read

खोपोलीतील शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांची खोपोली नगरपालिकेत धाव

Loading

खोपोलीतील शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांची खोपोली नगरपालिकेत धाव

: मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी ) खोपोली गरपालिका शाळेतील शिक्षकांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी आज कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री अनुप धुरी यांची भेट घेऊन खालील शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी मागणी केली
1) श्री नरेंद्र म्हात्रे सर तसेच अन्य शिक्षकांना सातव्या वेतन यांना आयोगाप्रमाणे पगार मिळण्याबाबत.
2) नगरपालिकेमध्ये कार्यरत शिक्षक- शिक्षकेतना शासनाकडून पगार अनुदान मिळण्याबाबत
3) नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांची भूषण दिवस कमी होत चाललेली पटसंख्या
4) नगरपालिकेच्या तीन शाळांना शासनाकडून अनुदान मिळणे बाबत
सोबत उपस्थित असलेल्या भाजपचे रमेश रेट्रेकर – खोपोली शहराध्यक्ष , प्रमोद पिंगळे – सरचिटणीस , शोभाताई काटे- महिला मोर्चा , अध्यक्ष अश्विनी अत्रे – शहर सरचिटनिस , वंदना म्हात्रे , शिक्षक सेनेचे अध्यक्ष दिलीप म्हसे सर, इत्यादी कार्यकर्त्यांच्या मागणी नुसार नागरी सुविधां बाबत सुद्धा चर्चा करण्यात आली प्रामुख्याने नगरपालिका क्षेत्रातील सर्व ठिकाणची स्वच्छता नेहमीच झाली पाहिजे, डोंगरालगत असलेल्या व पावसाळ्याच्या दिवसात भूस्खलन होण्याचा धोका असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत , बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह दुरुस्ती करण्याबाबत, व्यायाम शाळा दुरुस्तीबाबत इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली
तसेच कर्जत व खोपोली- खालापूर तालुक्यातील काही वैयक्तिक समस्या घेऊन आलेल्या शिक्षकांच्या भेटीही घेतल्या, जिल्हास्तरावरच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी 3 जुलै रोजी शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेण्याची ठरले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *