1 min read

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर आपल्या शाळेच्या माध्यमातून जपत आहेत, आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे पावित्र्य

Loading

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर आपल्या शाळेच्या माध्यमातून जपत आहेत, आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे पावित्र्य

ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) गेल्या 25 वर्षापासून एकही वर्षी न चुकता कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर हे आपल्या शिवभक्त विद्यामंदिर , सिंड्रेला इंग्लिश स्कूल, शंभूराजे विद्यामंदिर, आणि एम के पाटील विद्यालय मार्फत “आषाढी एकादशी” निमित्त महाराष्ट्राची संस्कृती ,परंपरा जोपासावी म्हणून विद्यार्थ्यांसह दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत
पूर्वी बदलापूर परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचे अनेक लोक एकत्र येऊन आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा आयोजित करत होते, अशा दिंडीचे आयोजन करणारे अनेक ज्येष्ठ वारकरी आज हयात नाहीत, त्यामुळे बदलापूर परिसरामध्ये दिंडी सोहळ्याचे प्रमाण कमी झाले आहे, दिंडी सोहळ्याचे पावित्र जोपासण्याचे कार्य शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी आपल्या शाळांच्या, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मार्फत सदैव टिकून ठेवले आहे
नवीन वडवली ते ज्ञानप्रभा विद्यापीठ एवढे अंतर विठ्ठलाचे नामस्मरण, अभंग, ओव्या गाऊन शिक्षक आणि विद्यार्थी परिसरातील नागरिकांना आपल्या परंपरा, संस्कृती दर्शन घडूवुन आणत आहेत, विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला वारीसाठी जाऊ न शकणाऱ्या नागरिकांना दिंडी सोहळ्यातून विठ्ठल रुक्माई चे दर्शन पालखी दिंडी सोहळ्यातून घडून आणण्याचे कार्य शाळेच्या मार्फत केले जात असून, विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी आणि परंपरा शाळेमार्फत लावली जाते हे पाहून अनेकांनी, पालकांनी शाळेचे शिक्षकांचे कौतुक केले , दिंडी सोहळ्यात सुमारे 2000 विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *