1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कूल येथे आषाढी एकादशी निमित्त वारीचे आयोजन

Loading

आषाढी एकादशी साने गुरुजी कन्या हायस्कूल येथे साजरा
साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांच्या संकल्पनेतून मागील वर्षापासून आषाढी एकादशी साजरी केली जाते.आज दिनांक 28/06/ 2023 रोजी साने गुरुजी कन्या हायस्कूल येथे आषाढी एकादशी निमित्त वारीचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल नामाचे गजराने शिक्षणाची पंढरी साने गुरुजी शाळा अवघी दुमदुमली. यावेळी संस्थेचे सचिव दादासाहेब श्री संदीप घोरपडे ,संस्थेचे संचालक आप्पासाहेबश्री. गुणवंत पाटील व नानासाहेब ॲड.श्री.अशोक बाविस्कर मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांनी विठ्ठल रखुमाईचे पूजन केले.. शाळेच्या विद्यार्थिनींनी यावेळी अभंग सादर केले.नानासाहेब श्री. अशोक बाविस्कर यांनी अमळनेरला प्रति पंढरपूर का म्हणतात ते सांगितले. मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांनी विद्यार्थिनींसह विठूरायाला शेतकरी राजासाठी व शिक्षणाच्या वारकर्यांसाठी साकडे घातले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.घोरपडे सरांनी तुकारामांची गाथा परिवाराचे तुकारामांची गाथा सांगितली.
सदर कार्यक्रमा वेळी विद्यार्थिनींनी घरून तयार करून आणलेल्या महाप्रसादाचे शाळेत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता समाधान पाटील या विद्यार्थिनींने केले. आभार प्रदर्शन उत्कर्षा हरी महाजन हिने केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्षिका किरण निकम व हिमानी महेंद्र पवार या विद्यार्थिनींनी विशेष मेहनत घेतली.
यावेळी वर्गशिक्षिका सौ. मोनाली वंजारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वरिष्ठ शिक्षक व शिक्षिका सौ मनीषा वैद्य श्री आर एम देशमुख श्री शैलेंद्र साळुंखे सौ धनश्री वानखेडे श्री मुकेश पाटील श्री दीपक महाजन व शेख सर यांच्यामुळे कार्यक्रमात विशेष भर पडून कार्यक्रम यशस्वी झाला. व कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *