1 min read

चामुंण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे आषाढी एकादशी निमित्ताने पायी दिंडी

Loading

चामुंण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव येथे मा.अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर संस्थापक अध्यक्ष यांचे मार्गदर्शनानुसार “आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी काढण्यात आली.शाळेतील विशेष शिक्षक प्रताप पाटील व दिपक महाजन यांनी अप्रतिम पालखी तयार करून सजावट केली.विद्यार्थी चि.निखिल कलाल याला विठु माऊलींच्या वेशभूषेत सजवण्यात आले होते.शाळेतील पायी दिंडी शाळेपासून ते श्री.चैतन्य सेवा आश्रम वंजारी खुर्द पारोळा येथील मंदिरात घेऊन जाण्यात आली.शाळेतील सौ.संगिता महाजन मॅडम यांनी तुळस डोक्यावर घेऊन पायी वारीची शोभा वाढवली तर सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गोल रिंगण करुन टाळ, मृदंगाच्या गजरात नृत्य सादर केले.एकंदरीत सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *