राज्यातील कला शाखेतील विद्यार्थी संख्याबाबत शहरी व ग्रामीण भागातील अट शिथिल करा, जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री तथा संस्थाचालक संघटनेचे कार्याध्यक्ष विजय नवल पाटील यांना निवेदन
![]()

जळगाव: आज दि.२७ जून रोजी मा.श्री.विजयजी नवल पाटीलसाहेब (माजी केंद्रीय मंत्री तथा कार्याध्यक्ष राज्य संस्थाचालक महामंडळ) जळगाव येथे आले असता जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने राज्यातील कला शाखेतील विद्यार्थी संख्या शहरी भागात १२० वरून ६० आणि ग्रामीण भागात ८० वरून ४० इतकी शिथिल करून सदर विद्याशाखेचे अस्तित्व पर्यायाने संबंधित शिक्षकांच्या नोकऱ्या टिकवण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करावे असे जुक्टो संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री प्रा.नंदन वळींकार, प्रा.सुनील सोनार, प्रा.शैलेश राणे, प्रा.डॉ.अतुल इंगळे, प्रा.सुनील गरुड, प्रा.डी.डी.पाटील, प्रा. राजेंद्र चव्हाण, प्रा.भगतसिंग निकम, प्रा.योगेश धनगर यांनी निवेदनाद्वारे साकडे घातले. राज्य संस्था चालक महामंडळाने देखील या मागणीला बिनशर्त पाठिंबा दिला असून लवकरच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दिपकजी केसरकर साहेब व खासदार सौ.सुप्रियाताई सुळे (अध्यक्ष राज्य संस्थाचालक महामंडळ) यांच्याशी प्रत्यक्ष सुसंवाद साधण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्यातील उ.मा.वि./क.म.वि.शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून होणे, आश्र्वासित प्रगती योजना लागू करणे, पायाभूत पदांना मान्यता देऊन वेतन सुरू करणे, आय.टी. विषयास अनुदान देणे या व इतर समस्यांबाबत देखील अवगत करून सविस्तर निवेदन देण्यात आले. यावेळी गौरीशंकर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय, रवंजे ता. एरंडोलचे प्राचार्य श्री. सानप सर व विशेष सरकारी वकील श्री.बी.के.शिंदे देखील उपस्थित होते.

