1 min read

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे नवनिर्वाचित कुलगुरू श्री संजीव जी सोनवणे सर यांचा यथोचित सत्कार.

Loading

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे नवनिर्वाचित कुलगुरू श्री संजीव जी सोनवणे सर यांचा यथोचित सत्कार.

महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी घेतली भेट

,नगर — श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे नवनियुक्त कुलगुरू श्री संजीव सोनवणे यांच्यासोबत सदिच्छा भेट घेऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र भर मुक्त विद्यापीठ तर्फे कुठल्या कुठल्या योजना राबवता येतील, तसेच नाशिक हे कांदा भाजीपाला व द्राक्षाचे माहेरघर आहे व नाशिक मध्ये फळबाग होऊ शकते यापुढे शेतकऱ्यांसाठी कुठल्या योजना राबविण्यात येतील तसेच नव उद्योजक यांना कशाप्रकारे उद्योगाचे मार्गदर्शन केले जाईल विद्यापीठाकडून या आणि अशा भरपूर महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी श्री सोनवणे सरांना वि वा शिरवाडकर लिखित नटसम्राट पुस्तक व पेढे खाऊ घालून सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *