1 min read

सार्वजनिक विद्यालयात शाहू महाराजांची जयंती साजरी.

Loading

सार्वजनिक विद्यालयात शाहू महाराजांची जयंती साजरी.
असोदा- सार्वजनिक विद्यालयात छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक डॉ.मिलिंद बागुल यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी मंचावर ज्येष्ठ शिक्षक एल.जे.पाटील,डी.जी.महाजन,
मंगला नारखेडे, शुभांगीनी महाजन, सचिन जंगले उपस्थित होते. सचिन जंगले, एल.जे.पाटील यांनी राजश्री शाहू महाराजांच्या जीवन चरित्राविषयी माहिती सांगितली.हेमांगी पाटील, प्रज्ञा सपकाळे,कोमल नारखेडे,तनुश्री सोनवणे,दक्ष कोल्हे या विद्यार्थ्यांनीही राजश्री शाहू महाराज यांच्या विषयी थोडक्यात माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.डी.कचरे,तर आभार जी.आर.महाजन यांनी मानले. कार्यक्रमाची यशस्वीततेसाठी भावना महाजन सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *