1 min read

नितेश गुजराथींचे एम. एस ला विशेष प्राविण्य

Loading

नितेश गुजराथींचे एम. एस ला विशेष प्राविण्य

अमळनेर : येथील नितेश जयेश गुजराथी हा विद्यार्थी न्यूयॉर्क येथील बफेलो विद्यापीठात एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या एम. एस या उच्च मानल्या जाणाऱ्या पदव्युत्तर पदवीत ए++ ग्रेड मिळून विशेष प्राविण्य सिद्ध केले आहे. यापूर्वी त्याने एम.ए. एम.सी.ओ.ई महाविद्यालय, पुणे येथून बी.ई (कॉम्प्युटर) ही पदवी तर एम.बी.ए (फायनान्स) ही पदवीदेखील विशेष प्राविण्यसह प्राप्त केली आहे. नितेश गुजराथी याचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण अमळनेर येथील पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल येथे तर बारावीपर्यंतचे शिक्षण प्रताप कनिष्ठ महाविद्यालयात झाले आहे. माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतही त्याने विशेष चमक दाखविली आहे. नितेश गुजराथी हा विद्यार्थी प्रताप महाविद्यालयातील उपप्राचार्य तथा IQAC चे समन्वयक प्रा. डॉ. जयेश गुजराथी यांचे सुपूत्र आहेत. या यशाबद्दल त्याचे खान्देश शिक्षण मंडळातील सर्व पदाधिकारी, संस्थेचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ. ए.बी.जैन, संस्थेचे सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. एच. निकुंभ, डॉ. जयंत पटवर्धन, प्रा. डॉ. कल्पना पाटील, प्रा. पराग पाटील, प्रा. डॉ. विजय मांटे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी व इतर स्तरातूनही त्याचे विशेष कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *