1 min read

निरोगी भारतासाठी प्रत्येकाने योग करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Loading

निरोगी भारतासाठी प्रत्येकाने योग करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मोदी यांच्या प्रयत्नांनी संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले व संपूर्ण जगात योग पोहोचला. योग ही प्राचीन चिकित्सापद्धत आहे. निरोगी राहण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने योगशास्त्र तयार करण्यात आले. निरोगी भारताच्यानिर्माणासाठी प्रत्येकाने योग करावा”, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवन येथील योगप्रभात कार्यक्रमात केले. रोग होऊच नये म्हणून योगशास्त्र प्रभावी उपाय असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, की सध्याच्या जीवनात ताण-तणावांचा सामना करताना अनेक 'लाइफ स्टाईल' आजार बळावत आहेत. या आजारांचा सामना करण्यासाठी योगशास्त्र त्यावर प्रभावी उपाय आहे. यानंतर योग प्रात्यक्षिक करण्यात आले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे संचालन निलेश मदाने यांनी केले. कार्यक्रमाला विधानभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच योगप्रेमी उपस्थित होते. शतकी परंपरा असलेल्या कैवल्य धाम, मुंबई संस्थेच्यावतीने योग प्रात्यक्षिके करण्यात आली.

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *